राजिप शाळा, वडगाव येथे दप्तराचे वाटप

 बिर्ला कार्बन इंडिया यांच्या माध्यमातून राजिप  शाळा, वडगाव येथे दप्तराचे वाटप

         



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : ७ ऑक्टोबर,

            ग्रामीण भागत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सातत्याने विविध संस्था,पाताळगंगा परिसरातील कारखाने सातत्याने मदत करीत असतात.यामुळे पालकांच्या खिशाला बसणारी झळ कोठेतरी कमी होत असते. रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बिर्ला कार्बन इंडिया प्रा.लि.कडून मुलांना मोफत दप्तर वाटप खूप काही देण्यात आल्यांने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हास्य पहावयास मिळाले.
         

  
आज रायगड जिल्हा परिषद शाळा,वडगाव येथे शाळेतील सर्व मुलांना बिर्ला कार्बन इंडिया प्रा.लि.कडून मुलांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले.यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वडगाव सदस्य महादेव गडगे बिर्ला चे CSR प्रमुख मा.लक्ष्मण मोरे, प्रशांत गायकवाड ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा करुणा रवींद्र ठोंबरे ,उपाध्यक्षा राजश्री जांभूळकर, विषय शिक्षिका सरस्वती कवाद,शिक्षक वैजनाथ जाधव,स्वयं सेविका निकिता गडगे,साक्षी जांभूळकर व पालक उपस्थित होते.

              याप्रसंगी मोरे सरांनी पालकांना मुलीच्या शिक्षणाबद्दल विनंती केली.व बिर्ला कार्बन च्या शैक्षणिक दायीत्त्वाची माहिती दिली.या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुभाष राठोड  यांनी केले.तर आभार विद्यार्थी यश तानाजी पाटील याने मानले.

कोट 
पाताळगंगा परिसरात असलेला कारखाना सामाजिक उतरदायित्त्व भावनेतून शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असतील तर नक्कीच शाळांना गुणवत्तापूर्ण निकाल व चांगली पिढी घडविण्याचे स्वप्न बाळगायला हरकत नाही.
     राजिप शाळा वडगांव -  मुख्यध्यापक , सुभाष राठोड

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,