वनविभागाने काढली जनजागृती रॅली

 खोपोली शहरात वन्य जीव सप्ताह निमित्ताने वनविभागाने काढली जनजागृती रॅली



पाताळगंगा न्यूज : प्रसाद अटक 
खालापूर : ७ ऑक्टोबर,

               वन्यजीव सप्ताह निमित्ताने वनपरीमंडळ खोपोली यांचे वतीने खोपोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत केएमसी महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट विद्यार्थीनी तसेच वनविभागाचे वनपाल वनरक्षक सहभागी झाले होते.या वन्यजीव सप्ताह निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीतून वन्यजीव पर्यावरण वृक्ष यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.
           या रॅलीत केएमसी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष दिलीप पोरवाल, प्राचार्य डॉ.प्रताप पाटील,एनसीसी विभाग प्रमुख शीतल गायकवाड,वनपरीमंडळ खोपोली वनपाल भगवान दळवी,वनपरीमंडळ खालापूर रविंद्र म्हात्रे यांचे सह खोपोली वनविभागातील वनरक्षक नितीन कराडे, चंदन नागरगोजे, शीतल साळुंखे, संतोषी बास्टेवाड, कांचन गायकवाड तसेच खालापूर वनविभागातील वनरक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,