क्षितिजा मरागजे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य

 महाराष्ट्राची क्षितिजा मरागजे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची मानकरी




पाताळगंगा न्यूज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : ७ ऑक्टोबर,

               स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ६७ वी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २०२३-२४ आयोजन मध्यप्रदेश येथील विदिशा जिल्ह्यातील शमशाबाद तेथे ३ ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान पार पडले या स्पर्धेत महाराष्ट्र संघात राज्यस्तरीय स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील ४६ किलो वजनी गटात प्रथम पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी कु क्षितिजा जगदिश मरागजे हिची निवड झाली होती. या राष्ट्रीय स्पर्धेत पहिलेंदाच सहभागी होत आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर क्षितिजा हिने राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक जिंकून महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्याचे नावलौकिकात  भर टाकली आहे. 
                क्षितिजा ही खोपोली तेथील कारमेल कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थीनी असून ती कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे कुस्ती प्रशिक्षक श्री राजराम कुंभार,राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे,दिवेश पालांडे,विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे तसेच तीला क्रीडा शिक्षक जगदिश मरागजे,जयश्री नेमाने,समीर शिंदे यांचे ही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. 
             

 राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकानंतर क्षितिजाने राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदक पटकविल्याबद्दल आम. महेंद्र थोरवे, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर  तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, खोपोलीचे पो. नि. शितल राऊत, सहा. पो. नि. हरिश काळसेकर, कारमेल कॉन्व्हेंट मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया यांच्या सह अनेक मान्यवरांनी क्षितिजाचे कौतूक करून  तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,