भुरटे गोंधळीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी गोंधळी समाजाचे तहसीलदार,पोलीस यांना निवेदन
पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
खालापूर : १४ ऑक्टोबर,
आम्ही गोंधळी गोंधळी असे म्हणत सध्या आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात अनेक इतर समाजाचे लोकं ही नकली आणि भुरटे गोंधळी म्हणून फिरताना निदर्शनास येत आहेत.ज्यांचा गोंधळी समाजाशी काहिही संबंध नाही गोंधळी समाजाची बदनामी करणाऱ्या अश्या नकली भुरटे गोंधळ काम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन खालापूर तालुका गोंधळी समाजाचे वतीनं खालापूर तहसीलदार, खालापूर पोलीस स्टेशन व खोपोली पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे.
संबळ वाजवला म्हणजे गोंधळी असा अनेक सामान्य नागरिकांच्या मानता संभ्रम निर्माण झाला आहे.गोंधळी समाजाला कोणीतही पोटजात नाही तसेच गोंधळी समाज आहे हे देखील अनेकांना माहीत नाही त्यामुळे असे जे कोणी सध्या आपल्या परिसरात गोंधळी म्हणून वावरत असतील तर ते आपली फसवणूक करतात हे निदर्शनास येते.याची गांभीर्याने दखल घेतली जावी जेणेकरून गोंधळी समाजाची बदनामी होणार नाही तर ज्यांच्या घरी गोंधळाचे कार्यक्रम होतात अश्या सर्वसामान्य नागरिकांची देखील फसवणूक होणार नाही.
या हेतूने खालापूर तालुका गोंधळी समाजाचे वतीनं करवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले.या प्रसंगी बाबाजी जाधव,विठोबा अटक,राकेश उगले,प्रमोद उगले,हर्षद इंगळे प्रसाद अटक यांनी निवेदन दिले.
0 Comments