येवला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 स्वाभिमानी युथ  रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे  यांनी केले  88 व्या स्मृतिदिनानिमित्त येवला येथे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन 




पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : १५ ऑक्टोबर,

              भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. या घटनेच्या 88 व्या स्मृतिदिनानिमित्त येवला येथे देशभरातील आंबेडकरी जनतेने उपस्थित राहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले . स्वाभिमानी युथ  रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे सुद्धा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता उपस्थित राहिले होते . 
                 त्या प्रसंगी महाराष्ट्र  संघटक भगवान गरुड, मुंबई सेनेचे विजय जाधव रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे पेण तालुका अध्यक्ष अमित कांबळे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख अरुण धिवर, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिपक धिवर, व इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते . या कार्यक्रमाकरिता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर व युवा नेते जयदिप कवाडे हे उपस्थित होते . त्यांची सुद्धा महेश साळुंखे यांनी  मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली.  
             त्याचबरोबर येवला येथे नाशिक जिल्ह्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं जिल्हा संपर्क कार्यालय आहे त्या कार्यालयाला सुद्धा महेश साळुंखे यांनी सदिच्छा भेट दिली . त्याचबरोबर 1956 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर धर्मांतर केले होते  व बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम  सुद्धा रायगड जिल्ह्याच्या वतीने महेश साळुंखे यांनी पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित केलेला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील आणि पनवेल तालुक्यातील स्वाभिमानीच्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक आणि आंबेडकरी चळवळीचे पुरस्कर्ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना जयंती निमित्त त्यांच्या महान विचारांना व कार्याला कोटी - कोटी वंदन व महाअभिवादन सुद्धा जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे  यांनी केले  आहे.   

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन