कुमारी वैष्णवी सुनील कचरे यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित,कराड येथे पार पडला सत्कार सोहळा
खोपोली- दत्तात्रय शेडगे
अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने कुमारी वैष्णवी सुनिल कचरे यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिक्षण रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,हा सत्कार सोहळा कराड येथे नुकताच पार पार पडला
मौजे बेलवडे हवेली ता.कराड जि.सातारा येथील समाजसेवक स्वर्गीय विठोबा आप्पा कचरे आणि स्वर्गीय शंकर विठोबा कचरे यांची नात कुमारी वैष्णवी सुनील कचरे (इंजिनिअरिंग टेलिकॉमिनेशन महाविद्यालय कराड ) ह्या महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्यांनी समाजउपयोगी कार्य करत आहेत.
त्या ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे रायगड जिल्हा प्रभारी अध्यक्ष तथा समाजसेवक आनंदराव कचरे यांची ती पुतणी आहे
अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रविणजी काकडे यांच्या माध्यमातून 300 गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा कराड येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैष्णवी सुनील कचरे यांना नुकताच शिक्षण रत्न पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी डॉ.अशोकराव गुजर,ॲड.राजेंद्र डांगे,प्राचार्य भरत बल्लाळ, प्राध्यापक रवींद्र कोकरे,प्राध्यापक साहेबराव चौरे, धोंडीराम जाधव, संचालक यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना,अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे भुमिअभिलेख अधिकारी उल्हासराव वाघमोडे मलकापूरचे माजी नगर अध्यक्ष आबासाहेब गावडे कृषिरत्न पुरस्कार विजेते विश्वासराव मोरे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक शितल काकडे कैलास काकडे योगेश कुरले अंशुमन काकडे राजवर्धन भोसले आदित्य भोईटे सार्थ झेले तन्मय खरात आनंदराव कचरे रामचंद्र पुकळे सतिश थोरात महेश जाधव प्रभाकर कवळे उमेश हिवरे उत्कर्ष वाघमोडे रोहित येडगे यांनी परिश्रम घेतले
.jpg)
0 Comments