अवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेतीचे तातडीने पंचनामे करा,भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची मागणी

 अवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेतीचे तातडीने पंचनामे करा,भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची मागणी 

        



पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप 
खालापूर : १० नोव्हेंबर,    



               गेल्या दोन तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस वादळ वारा होऊन कर्जत तालुक्यातील भात पिकाचे मोठे नुकसान झले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे. पिक वीम्याचे पंचनामे झाले नाही तर पैसे मिळणार नाहीत . त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याच्या वतीने  तहसीलदार कर्जत यांचे कडे निवेदनाद्वारे त्वरित पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. 
                   तहसीलदार, कृषि विभाग तलाठी आणि विमा कंपन्याना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देऊन योग्यती नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत,  किसान मोर्चा विधानसभा समन्वयक विनायक पवार आणि किसान मोर्चा तालुका अध्यक्ष शिरीष कदम उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,