कर्जत चौक रस्ता त्वरित दुरुस्त करवा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र जन आंदोलन करणार - सुनील गोगटे भाजप

 कर्जत चौक रस्ता त्वरित दुरुस्त करवा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र जन आंदोलन करणार - सुनील गोगटे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य

     

पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप 
खालापूर : ८ नोव्हेंबर,
  
                 कर्जत भिसेगाव पासून मुंबई पुणे महामार्ग चौक पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक दुचाकी स्वार पडतात, एक्सीडेंट होतात चारचाकी वाहने सुध्दा जोरात आपटतात त्यामुळे गाडीचे नुकसान तर होतेच परंतु गाडीतील लोकांना पाठ दुखी कंबर दुखी सारखे आजार होतात. 
          गेले दोन महीने गणपती उत्सव पासून वारंवार उपविभागीय अभियंता यांना फोन वरुन किवा प्रत्यक्ष भेटून खड्डे बुजवावे अशी विनंती केली परंतु ते फक्त आज करतो उद्या करतो अशी उत्तरे देतातआणि ठेकेदार काम करत नाही ते इलेक्शन मधे मग्न आहेत असे सांगून वेळ मारून नेतात.सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारांच्या सवड़ी प्रमाणे चालणार का?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे 
              निष्क्रिय प्रशासनामुळे विनाकारण सरकार आणि बांधकाम मंत्री रोषाचे धनी होतात.त्यामुळे आज कार्यकारी अभियंता पनवेल निवेदन देऊन विनंती  की ताबड़तोब रास्ता दुरुस्तीचे काम करावे अन्यथा तीव्र जन आंदोलन केले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल.निवेदन देताना सुनील गोगटे  आणि सूर्यकांत गुप्ता कर्जत शहर सरचिटणीस भाजप उपस्थित होते. 
              ह्या विभागातील संबंधित अधिकारी रुपाली पाटील कार्यकारी अभियंता पनवेल, खालापूर उपविभागीय अभियंता राखाडे, व कर्जत उपविभागीय अभियंता वानखेडे यांनी लक्ष देऊन रस्त्यावर पडलेले खड्डे भरून घ्यावेत अन्यथा भाजपा कर्जत च्या वतीने मोठं आंदोलन केल जाईल असा इशारा भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील गोगटे यांनी इशारा दिला आहे

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,