दिवाळी सण साजरा करतांना ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्यावी,वावोशी दुरक्षेत्राचे पीएसआय आरोटे यांचे नागरिकांना आवाहन

 दिवाळी सण साजरा करतांना ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्यावी,वावोशी दुरक्षेत्राचे पीएसआय आरोटे यांचे नागरिकांना आवाहन



पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
वावोशी /खोपोली : ११ नोव्हेंबर,

                    दिवाळी सण म्हटला की फटाके आलेच हे फटाके फोडताना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.आपण फोडीत असलेल्या फटाक्यांच्या आवाजाचा आपल्या शेजाऱ्यांना, आजारी व्यक्तिला किंवा नवजात शिशूला त्रास तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी असे आवाहन वावोशी दुरक्षेत्राचे पीएसआय आरोटे यांनी नागरिकांना केले आहे.
                      फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणातील प्रदुषण सोबत मोठमोठ्या आवाजातील फटाक्यांमुळे ध्वनी प्रदुषणात वाढ होते.याची विपरीत परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनात होत असतो.दिवाळी म्हटलं की फटाके आलेच परंतु हे फओडतआंंनआ प्रत्येकाने काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.आपण व्यक्त करीत असलेल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतली तर सर्वांची दिवाळी आनंदाने साजरी होईल.सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची कापणी करून ते पिक एकत्र साठवून ठेवले आहे.
                      या साठवून ठेवलेल्या पिकांचे नुकसान आपण फोडत असलेला एखादा फटाका करणार नाही ना,यांची काळजी फटाके फोडणाराने घेतली पाहिजे.आपल्या शेजारी आजारी व्यक्ती किंवा वयस्कर व्यक्ती तसेच नवजात शिशू नाही ना,यांची सुध्दा काळजी घेऊन फटाके फोडावेत असे आवाहन वावोशी दुरक्षेत्राचे पीएसआय आरोटे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,