स्वामींनी प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी दिवाळी फराळ वाटपासाठी स्टाॅल वाटप

 स्वामींनी प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी दिवाळी फराळ वाटपासाठी स्टाॅल वाटप



पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : ११ नोव्हेंबर,

              स्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बचत गटातील महिला वर्गाने आपला आर्थिक विकास साधावा, त्यामुळे आपल्या कुटुंबाला हातभार लागेल असे प्रतिपादन खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी केले
                 स्वामिनी प्रतिष्ठानच्या  दिवाळी फराळ व गृहपयोगी वस्तूचे विक्री व प्रदर्शन सोहळ्याला शिवसेना (शिंदे गट) विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील, स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष कांचन जाधव ,माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, शिवसेना युवा नेते दिनेश थोरवे, विहिप चे रमेश मोगरे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष सुवर्णा मोरे, माजी नगरसेविका केविना गायकवाड , मेघा वाडकर, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद वाडकर, शिवसेना महिला आघाडीच्या सुरेखा खेडकर, तात्या रिठे, राजू गायकवाड, हरेश काळे, तसेच  यासह अनेक मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या बचत गटाच्या विक्री व प्रदर्शनात एकूण खालापूर तालुक्यातील २५  बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदविला आहे. 
                    या स्टॉलमध्ये दिवाळीचा फराळ त्याचप्रमाणे गृहपयोगी जीवनावश्यक वस्तू सजावटीच्या वस्तू, साडी व इतर वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी खोपोलीकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात भेट दिल्या.

चौकट-"

महिलांनि स्वावलंबी बनावे, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, छोट्या छोट्या उद्योगातून  महिलांनी शासनाच्या व बँकांच्या माध्यमातून मोठ्या उद्योगाकडे वळावे, हा स्वामीनि प्रतिष्ठानचा हेतू असल्याचे अध्यक्ष कांचनताई जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. केवळ प्रदर्शन न भरविता त्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत तसेच बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी कशाप्रकारे कागदपत्रकांची पूर्तता करता येईल याचेही प्रतिष्ठान तर्फे माहिती दिली जाते या प्रतिष्ठानच एकूण २००० सदस्य  असून या बचत गटाच्या माध्यमातून छोट्या छोट्या उद्योगातून आपला आर्थिक विकास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,