महाविकास आघाडीचे उमेद्वार दिपाली नरेश पाटील विजयी

 महाविकास आघाडीचे उमेद्वार दिपाली नरेश पाटील विजयी, कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण,भव्य मिरवणुक




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                                      माजगांव /आंबिवली : ६ नोव्हेंबर,

                  ग्रूप ग्राम पंचायत माजगांव झालेल्या निवडणूकीत दिपाली नरेश पाटील या निवडून आल्याचे निदर्शनास येताच कार्यकर्त्या उत्साह शिगेला पोहचला होता. आज दुपारी खालापूर पोलीस स्टेशन च्या परिसरात मत मोजणीत  ८४६  मत मिळवून थेट सरपंच पदाच्या मानकरी ठरल्या आहेत.यावेळी थेट सरपंच सह  महाविकास आघाडीचे  सहा सद्स्य निवडून आले, यावेळी भव्य अशी मिरवणूक या पंचक्रोशीत काढण्यात आली.                 


       
यावेळी  थेट सरपंच त्याच्या समवेत उभे असलेले सदस्य  प्रांजळ प्रदिप जाधव, मधुकर गायकवाड ,अर्पणा यशवंत शिंदे राजेश शिवराम पाटील ,वैशाली नितिन महाब्दि - वंदना सुधाकर महाब्दि सहा सद्स्य निवडून आल्यांने कार्यकर्ते यांचा उत्साह औरच होता.काही ठिकाणी सद्स्याला हार  पत्करावी लागली.मात्र थेट जनतेतून म्हणून दिपाली नरेश पाटील विजयी  झाल्यामुळे घोष वाक्यांनी हा परिसर गर्जुन गेला होता.                                       


       
महाविकास आघाडीचे  सरपंचासह सहा सदस्य निवडून आल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष प्रचंड प्रमाणात पहावयास मिळत होता. हातात पक्षाचे झेंडे आणि गुलाल उधळीत आघाडीची विजयी मिरवणूक खालापूर ते पौध, या परीसरात जल्लोषात फिरविण्यात आली. यावेळी यात्रेसारखे स्वरुप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळाले.माजगांव  ग्रामपंचायत निवडणुकीत,मनसे, आरपीआय,राष्ट्रवादि,शेकाप आघाडीच्या सरपंच  दिपाली पाटील  हे भरघोस मतांनी थेट जनतेतून निवडून आल्याने त्याचे ठीक- ठिकाणी महिला वर्गांनी औक्षण करण्यात आले
.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,