मनोरुग्णाचे अभ्यंग स्नान करुन सहजसेवेने केली दिवाळी साजरी...सहज सेवा,सातत्यपूर्ण सेवा...

 मनोरुग्णाचे अभ्यंग स्नान करुन सहजसेवेने केली दिवाळी साजरी...सहज सेवा,सातत्यपूर्ण सेवा... 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : १४ नोव्हेंबर,

             सहज सेवा फाऊंडेशनने खोपोलीत २०१६  पासून मनोरुग्ण स्वच्छता उपक्रम हाती घेतला होता. खोपोलीत दळणवळण साठी येणाऱ्या विवीध मार्गाने अनेक मनोरुग्ण दाखल होत असतात परंतु सहज सेवा फाऊंडेशनने राबविलेल्या मनोरुग्ण स्वच्छता मोहीममुळे अनेकांना आपले हरवलेले कुटुंबीय परत मिळण्यास मदत देखील झालेली आहे.
                          समाजातील अनाथ घटकांना सेवा देणे हे संस्थेचे मोठे कार्य असून याच कार्याच्या जाणिवेतून दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी खोपोलीतील स्थानीक रहिवासी असलेले परंतु दुर्दैवाने मनोरुग्ण ठरलेले भरत जाधव यांना अभ्यंग स्नान देवून दिवाळी साजरी केली जाते. गगनगिरी आश्रम जवळील पाताळगंगा नदी किनाऱ्यावर गरम पाण्याने अंघोळ घालून  दिवाळी साजरी करण्यात आली.
              यानिमित्त भरत याला फराळ देण्यात आला.दिवाळीच्या पहाटे हि स्वच्छता मोहीम पाचव्या वर्षी राबविण्यात आली.यावेळी स्वछता दूत म्हणुन धनराज जंबगी,बंटी कांबळे,दुर्गेश देवकर,मोईन खान,संतोष गायकर,अजय कांबळे यांनी सहकार्य केले.       
             या उपक्रमासाठी सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक - अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशीका शेलार,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,महीला संघटक निलम पाटील,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार,मार्गदर्शक राजेंद्र फक्के सल्लागार नरेंद्र हर्डीकर यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन