लक्ष्मण झिपरा जाधव यांचे निधन

 लक्ष्मण झिपरा जाधव यांचे निधन



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
  पाताळगंगा  १४ नोव्हेंबर,  
               
             खालापूर  तालुक्यातील आंबिवली येथिल राहणारे कै. लक्ष्मण झिपरा जाधव यांचे औद्योगिक कारखान्यात काम करीत असतांना अपघात झाले होते.त्यांना तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असतांना त्यांची ९ नोव्हेंबर, रोजी प्राण ज्योत मावळली ते वयाच्या ६५  वर्षाच्या होत्या.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय,वारकरी आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.                                                            त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने  कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे.                                                                                           त्यांचे दशक्रिया विधी शनिवार  १८   नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र धाकटी पंढरी साजगांव तर उत्तरकार्य  मंगळवार  दिनांक २१ नोव्हेंबर, रोजी माजगांव ,आंबिवली येथिल त्यांच्या निवास स्थानी होणार असून या निमित्ताने ह.भ.प.संदिप महाराज यादव  आसरेवाडी यांचे सकाळी १० वाजता प्रवचन होणारा आहे.त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अरुण जाधव,भाऊ, बहिणी,आत्या सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन