आय लव सारसई बोधचिन्हाचे उदघाटन....केअर ऑफ नेचर संस्थेचा स्तुत्य उपक्रम

 आय लव सारसई  बोधचिन्हाचे उदघाटन....केअर ऑफ नेचर संस्थेचा स्तुत्य उपक्रम 








पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे ,राम ढेबे 
खालापूर : १४ नोव्हेंबर,

            केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या वतीने सारसई या गावात  आय लव सारसई  या बोधचिन्हाचे नुकताच अनावरण करण्यात आले,
                  पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीत हा सारसई विभाग येत असून येथे अनेक वाड्या वस्त्या आहेत ,ह्या वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे यांच्या पुढाकाराने त्यांनी वेळोवेळी या संस्थेच्या पदाधिकारी यांच्या बोलून हा उपक्रम राबविण्यात आला, 
                   केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुबंईकर यांच्या सहकार्याने सारसई येथे आय लव सारसई या बोधचिन्हाचे नामकरण करून उद्घाटन करण्यात आले, या उपक्रमाने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून संस्थेचे आभार मानले आहेत, 
            यावेळी आपटा ग्रामपंचायतच्या सरपंच नाजणीन पटेल, सदस्या मनीषा वाघे, संगीता बावदाणे, कीर्ती कदम, रायगड भूषण रत्नाकर घरत, सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे, आदींसह गोविंदावाडी, टपोरावाडी  बागेचीवाडी, सोनारवाडी, खडकीचीवाडी टोकाचीवाडी, माडभोवनवाडी, पळसवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन