आंबिवली येथे दु:खद घटना घडल्यामुळे शिव स्मारक येथे अभिवादन करण्यांस आलो नाही : सामाजिक कार्यकर्ते - नरेश पाटील
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली २१ नोव्हेंबर,
ग्रूप ग्राम पंचायत माजगांव निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या सरपंच,उप सरपंच यांचा पदग्रहण कार्यक्रम शुक्रवारी करण्यात आले होते.मात्र आंबिवली येथे दु:खद घटना घडल्यामुळे आंबिवली येथे प्रचार रॅली न काढता आमचे कार्यकर्ता यांस आमच्या वतीने हिंदुचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांस अभिवादन तसेच पुष्पहार अर्पण करण्यासाठी पाठविण्यात आले होते.
मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी पाताळगंगा न्यूज या वेब पोर्टल येथे नवनिर्वाचित सरपंच,उप सरपंच,सदस्य यांनी शिव स्मारक यांस अभिवादन करण्यांस विसर पडला अशी खंत व्यक्त केली असल्यांची बातमी प्रसिद्ध झाली होती.मात्र महाविकास आघाडीचे सर्वच उमेद्वार हे हिंदुच्या सर्व महापुरूष यांना नतमस्तक होत असतात.मात्र एखाद्या ठिकाणी दु: खद घटना घडली की त्या ठिकाणी मिरवणूक काढणे किंवा मोठा उत्सव साजरे करणे योग्य नाही.
यामुळे आम्ही माजगांव येथिल राजिप शाळा येथे असलेले शिव स्मारक,तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांस अभिवादन करण्यात आले.यामुळे यामध्ये कोणीही राजकारण आणू नये दुखाच्या ठिकाणी दुख व्यक्त करणे,आणी सुखाच्या ठिकाणी आनंद हेच आमचे धोरण असून सर्व ग्रामस्थ आपण जाणत आहात यामुळे कोठे राजकारण करावे यांचे भान असावे असे आवाहन महाविकास आघडीच्या माध्यमातून करण्यात आले.
0 Comments