घेरेवाडी येथील निलेश कोकरे यांची पोलीस दलात निवड,ग्रामस्थांच्या माध्यमातून सत्कार भव्य मिरवणूक
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १२ मे,
मावळ तालुक्यातील लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरेवाडी येथील निलेश बाळू कोकरे यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली असल्याने ग्रामस्थांनी त्यांची भव्य मिरवणुक काढून भव्य सत्कार करण्यांत आला.
निलेश बाळू कोकरे हे एमएच करिअर अकॅडमी कार्ला येथील विद्यार्थी असून त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण गावासाह तालुक्याचे नाव मोठे झाले आहे,नुकताच महाराष्ट्र पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे येरवडा कारागृह येथे त्यांची निवड झाली.
निलेश कोकरे यांची निवड होताच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत,तसेच निलेशला मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे आणि अकॅडमीचे त्यांनी आभार मानले.
0 Comments