पाषाणे येथिल धरणामध्ये टुरिस्ट व्यवसायीकाचा मृत्यू

 पाषाणे येथिल धरणामध्ये  टुरिस्ट व्यवसायीकाचा  मृत्यू,हेल्प फाउंडेशन ने बुडालेली व्यक्ती बाहेर काढण्यांस यश 




माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : ११ मे,


            नवी मुंबई येथिल दिघा गावातील टुरिस्ट व्यवसाय करणारे अजय रावत वय २८ असून ते आपल्या चार मित्रांसह  कर्जत तालुक्यामधील नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील पाषाणे गावातल्या लघु पाटबंधारे खात्याच्या धरणामध्ये मौज मजा करण्यासाठी आले होते. त्यांना धरणाच्या तळ्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला.
            पाण्यांच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे हा प्रकार घडला.मात्र त्यांच्या मित्रमंडळीनी शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला.मात्र अपयश आल्याने त्यांनी पाषाणे गावातील गावकऱ्यांना याबाबतची माहिती दिली आणि नेरळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या हेल्प फाउंडेशनच्या गुरुनाथ साठेलकर यांना संपर्क केला.

                या घटनेची माहिती मिळताच,तो पर्यंत सायंकाळ झाली असल्यामुळे,अंधारात शोधकार्य करणे शक्य नसल्यामुळे, हेल्प फाउंडेशनची टीम दुसऱ्या दिवशी अर्थात आज सकाळी त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी धरणात बुडालेल्या अजय रावत यांचे शव बऱ्याच प्रयत्नांती बाहेर काढण्यांत अपघात ग्रस्ताच्या टिम ला यश आले.यावेळी नेरळ पोलीस स्टेशनचा अधिकारी वर्ग आणि अजय रावत यांचे नातेवाईक घटनास्थळी होते.स्थानिक नागरिकांनी देखील यावेळी मोलाचे सहकार्य लाभले असून.या घटनेची नोंद अपघाती मृत्यू अशी नेरळ पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. 


         ------------चौकट -----------
कोणत्याही धरण तलाव किंवा नदीमध्ये कोणाला पोहता येत असेल अथवा नसेल तरी देखील स्थानिक माहीतगारांच्या सल्ल्याशिवाय पाण्यामध्ये उतरू नये, त्यांच्या जीविताला धोका संभवतो, असा इशारा हेल्प फाउंडेशनच्या वतीने पर्यटकांना देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर