पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव - आंबिवली : २३ नोव्हेंबर,
रायगड जिल्हातील बोंबल्या विठोबा यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या साजगाव यात्रेस कार्तिकी एकादशी पासून प्रारंभ झाला असून तालुक्यासह जिल्हातील वारकरी संप्रदाय विठू रायाच्या चरणी लीन होण्यासाठी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.खालापूर तालुक्यातील तळवली गावातील वारक-यांनी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. ही पायी दिंडी माजगांव,अंबिवली येथे येताच ग्रूप ग्राम पंचायत नवनिर्वाचित उप सरपंच राजेश पाटील,स्मित संकल्प व्यवस्थापक - मंगेश पाटील,काळूराम जाधव,नितिन काठावले,यांच्या हस्ते या दिंडीचे स्वागत समारंभ करुन अल्प आहार देण्यात आले.यावेळी आंबिवली गावातील ग्रामस्थ संदीप पाटील,निलेश ढवाळकर,रविंद्र काठावले,मनस्वी पाटील,मोनिका जाधव,बहुसंख्येने वारक-यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.मुखात हरीचे नाम टाळ,मृदुंग,यांच्या स्वरामध्ये ही दिंडी मजल -दरमजल करीत साजगावाच्या विठू रायाचे चरणी लीन होऊन या दिंडीनेविठु रायाचे दर्शन घेतले. संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली धाकटी पंढरी येथे संत तुकाराम महाराज घाटमाथ्यावरून मिरची व्यापार करण्यासाठी या परिसरात येत असत.परंतू मिरची विकल्यानंतर पैसे वसूल झाले नाही.तेव्हा तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाच्या नावाने बोंब मारल्या तेव्हा पासून या विठ्ठलास बोंबल्या विठोबा असेही संबोधले केल्याची आख्यायिका आहे. या पायी दिंडीचे आयोजन मधुकर मालकर,भगवान मालकर,जगन्नाथ मालकर,तानाजी मालकर,भरत मालकर,पांडुरंग मालकर,जयराम मालकर,बाळाराम मालकर,देविदास मालकर महेंद्र मालकर,जनार्धन बडेकर,रामदास बडेकर,रामदास मालकर,अनंता मालकर,लक्ष्मण मालकर,तसेच महिला वर्ग म्हणून मालकर उषा,संगीता,स्वाती,निर्मला,सविता,कृतीका,गुलाब,भारती,भागु,अवीता,सुरेखा,रंजना,पल्लवी,अलका,सुशीलाजिजा,कमल अदि महिला वर्ग ,तसेच शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी होते.
0 Comments