जिवन जगण्यासाठी आरक्षण महत्वाचे - मनोज जरांगे पाटील
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : २१ नोव्हेंबर,
मराठा आरक्षणांची लढाई अनेक वर्षापासून सुरू आहे.मात्र आता ती अंतिम टप्यात आले असून या लढ्यासाठी आज पर्यंत ५० बांधवांचे बळीदान गेले.मराठ्यांना आरक्षण होते.मात्र ते मिळू न देण्यांचा घाट घातला गेला असून जाणूनबुजून ते आरक्षण दिले जात नाही.त्यातच मराठ्यांचे पुरावे सापडत चालले आहेत.हा समाज लढून लढून थकला आहे.मात्र ते पेटून उठला आहे. जिवनांमध्ये जगण्यासाठी शिक्षणांसाठी,नोकरीसाठी आरक्षण महत्वाचे आहे अशी तोफ मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभेत कडाडली.
सकळ मराठा समाज रायगड च्या वतीने खोपोली येथिल कै.पी जाधव क्रिडा संकुल डी.पी. रोड चिंचवली - लौजी खोपोली येथे या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील शिलफाटा येथिल अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांस हार अर्पण करून आणी अभिवादन करुन यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात आणी फुले उधळून स्वागत करण्यात आले. सकळ मराठा समाज राज्य समन्वय डॉ.सुनिल पाटील,विनोद साबळे,यांच्या उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपस्थित बाळ कलाकार,शिव शाहिर यांनी उपस्थित आपली कला सादर करुन मराठा समाज्यांची मने जिंकली त्याच बरोबर मनोज जरांगे पाटील यांचा मराठ्यांसाठी करीत असलेल्या लढा आणी त्यांचे योगदान सांगण्यात आले.
यावेळी ते पुढे म्हणाले की,आरक्षण नसल्यामुळे मुले शिकून मागे राहिली ज्यांची पात्रता नाही ते पुढे गेले.मराठ्यांची मुले हुशार आहे.मात्र ७० वर्षापूर्वी आरक्षण मिळाले असते तर आज मोठ्या हुद्द्यावर असते. मराठ्यांनी कधी जात पात पाहिली नाही.दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आले ते पुसण्यासाठी जाणारा,संकट समयी धावून जाणारा मराठीच,आहे.मी माझ्या जिवाची पर्वा करीत नाही,तुमच्या चेहऱ्यावर आरक्षणांचे हसू आले की, माझ्या जिवनांचे सार्थक होइल,आज जवळ - जवळ २९ लाख नोंदी ओबीसी मध्ये अढळल्या आहेत. मराठ्यांनी नेत्यांना मोठे केले. एकेकाळी मजुरीवर जाणारे,आता मोठे बंगले, गाडीत फिरतात. मुले परदेशात शिकतात,आपण मात्र त्यांचे झेंडे घेतले त्यांना वेळ आली आहे जागा दाखवून द्यायची.
आपल्यामध्ये मत भेद बाजुला ठेवा,एक जुट रहा. तुम्ही कायदा सुव्यवस्था राखा,व्यसनापासून दुर रहा,यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहे.आपणांस एकच सांगू शकतो की, २४ डिसेंबर पर्यंत आपण त्यांस अल्टिमेट दिले आहे, २५ तारखेनंतर मराठ्यांची अंदोलनांची दिशा ठरवली जाईल असे मार्गदर्शन मनोज जरांगे पाटील व्यक्त केले.
0 Comments