ग्राम पंचायत निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा पोहचली गावात

 ग्राम पंचायत निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा पोहचली गावात



पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
वावोशी / खोपोली : ५ नोव्हेंबर,

                खालापूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन सज्ज झाली असून ही मशीन आज ग्राम पंचायत निवडणूक ठिकाणी सुखरूप पोहोचली आहे.आज सकाळ पासून सुरू होणाऱ्या मतदान प्रक्रियेत जवळपास ५६ हजार मतदार २२ सरपंच आणि १५३  सदस्य पदाच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष निवडणूकीकडे लागले आहे.
                  खालापूरातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरची तयारी निवडणुक विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आली असून ही यंत्रणा निवडणूक घेण्यासाठी ग्राम पंचायतीच्या निवडणूक ठिकाणी दाखल झाली आहे.निवडणुकीसाठी ९३ इव्हीएम मशीन सज्ज ठेवण्यात आल्या असून या सर्व मशीन निवडणूक होत असलेल्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत.गुरूवार दि.२ आँक्टोंबर रोजी सकाळी.११ वाजता तहसिल कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली  आणि सरपंच आणि सदस्य पदाचे उमेदवारांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीनची प्राथमीक स्तरावरची तपासणी करण्यात आली.तालुक्यात राजकीय वातावरण तापत असले तरी दुसरीकडे निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक संदर्भात तयारी करण्यात आली आहे.
                 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी दि.५ आँक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. दि.६ आँक्टोंबर २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदाचे ६० उमेदवार तर सदस्यपदासाठी एकूण २०२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत,त्यामधील सदस्य पदाचे ४९ उमेदवार बिनविरोध झाल्याने आता १५३  सदस्यपदाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
                उद्या ९३ केंद्रावर ५६ हजार ८८२  मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रियेसाठी ४६२ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार आयुब तांबोळी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,