वावोशी परिसरातील मराठा बांधवांचा भव्य कॅण्डल मार्च

 वावोशी परिसरातील मराठा बांधवांचा भव्य कॅण्डल मार्च



पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे 
खोपोली : ४ नोव्हेंबर,


                      मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर चाललेल्या आंदोलनाला वावोशी ग्रामस्थांकडून कॅण्डल मार्च काढून जाहीर पाठिंबा देण्यात आला.या कॅण्डल मार्च मध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला.वावोशी गावातून निघालेल्या कॅण्डल मार्च मध्ये गोरठण ग्रामस्थ सहभागी होत पुढे हा कॅण्डल मार्च वावोशी फाटा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ समाप्त करण्यात आला.
                   भावा संघटनेच्या पुढाकारातून निघालेल्या कॅण्डल मार्च मध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे या कॅण्डल मार्च मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे म्हणणे होते.पुढे या कॅण्डल मार्च मध्ये गोरठण ग्रामस्थांनी आपला सहभाग दर्शविल्याने मराठा आवाज बुलंद झाल्याचे पहायला मिळाले.एक मराठा लाख मराठा,लाख मराठा कोटी मराठा,कोण म्हणतो मिळणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अश्या घोषणांनी वावोशी फाटा परिसर दुमदुमून गेला होता.या मोर्चात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
    ____ पोलीस बंदोबस्त चोख होता---
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निघालेल्या कॅण्डल मार्च मध्ये सहभागी होण्यासाठी सर्वच जाती धर्माचे लोक येणार असल्याने कदाचित या मोर्चाचा भंग करण्यासाठी काही समाजकंटक हजेरी लावतील आणि शांततेत निघणाऱ्या मोर्चाला कुठेतरी गालबोट लागेल अशी शक्यता असल्याने तसेच दक्षता म्हणून खालापूर पोलिसांनी आपला फौजफाटा तैनात केला होता.पी.एस.आय.आरोटे व त्यांचा संपूर्ण स्टाफ बंदोबस्ताला हजर असल्याचे पहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,