पी.एन.पी.शाळा वावोशीचा स्तुत्य उपक्रम

 (पी.एन.पी.शाळा वावोशीचा स्तुत्य उपक्रम)श्रीनगर येथील सैनिकांसाठी दिवाळी फराळ व भेट कार्ड बणवून पाठविले



पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
वावोशी खोपोली : ३ नोव्हेंबर,
  
            ज्यांच्या मुळे आपण दिवसातील २४ तास निश्चिंतपणे राहू शकतो त्या सैनिकांना आपल्या परिवारासोबत दिवाळी सण साजरा करायला वेळ सुद्धा मिळत नसल्याने पी.एन.पी.शाळा वावोशी यांनी देशसेवा करणाऱ्या श्रीनगर येथील सैनिकांसाठी दिवाळी फराळ बणवून पाठविला आहे.श्रीनगर येथील सैनिक कार्यालयात हा फराळ पोस्टाने पाठविण्यात आला असून तो पुढे सैनिकांना वाटण्यात येणार असल्याने आपण बणविलेला फराळ सैनिकांना खायला मिळणार असल्याने त्याचा आनंद पी.एन.पी.शाळेच्या विद्यार्थ्यांसह

शिक्षक वर्गाला झाल्याचे पहायला मिळाले.
                    दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कोणासोबत तरी दिवाळी साजरी करावी हा विषय तर कायमच मनात होता.आम्ही दरवर्षी अनाथ मुलांच्या शाळेत, वृध्दाश्रमात,आदिवासी वाडी वस्तीवर अश्या ठिकाणी दिवाळी सण साजरा करतो.आता बहुतांश संस्था किंवा सामाजिक कार्यकर्ते,संस्था हे करण्यासाठी पुढे येत आहेत त्यामुळे यंदा आपण देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या सोबत दिवाळी साजरी करावी अशी संकल्पना मनात आली.या संकल्पनेला माझ्या सर्व सहकाऱ्यांनी होकार व सहकार्य केल्याने आम्ही आज हा दिवाळी फराळ देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी पाठवित आहोत याचा आनंद वाटत आहे.
             शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम फुलारी यांनी याबाबतची संकल्पना आपल्या शाळेतील शिक्षकवर्गाला तसेच शाळा व्यवस्थापन समितीला सांगितली.संकल्पना खरोखरच छान असल्याने या संकल्पनेला सहकार्य करण्यासाठी सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला.विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने भेटकार्ड तयार केले.शिक्षकांनी फराळ तयार करून तो व्यवस्थित पॅक केला.या फराळात चिवडा,चकळी,लाडू,शंकरपाळी आदीचा समावेश असून हा फराळ उत्तम प्रकारचे साहित्य वापरून तयार करण्यात आला आहे.


_ कोट- 
आपण सर्वजण थोड्याच दिवसात दिवाळी साजरी करणार आहोत. परंतु देशाचं रक्षण करणारे आपले वीर जवान मात्र ही दिवाळी त्यांच्या नातेाइकांसोबत साजरी करू शकत नाहीत. त्यामुळे त्याच्या कार्याची, कष्टांची जाण ठेवत, त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी १०० वीर जवानांसाठी दिवाळीचा फराळ पी. एन. पी. शाळेतर्फे पाठविण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांप्रती प्रेम, आदर व देशभक्ती जागृत होईल.
__ पूनम फुलारी
मुख्याध्यापिका,पी.एन.पी.शाळा वावोशी - खालापूर

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन