डॉ.सुनील पाटील रायगड जिल्ह्यातील मराठा समाजाचे यशस्वी नेतृत्व.......

 डॉ.सुनील पाटील रायगड जिल्ह्यातील मराठा समाजाचे यशस्वी नेतृत्व.......





पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे 
वावोशी / खोपोली : ३ नोव्हेंबर,
  
                  मागील वीस वर्षांपासून सातत्याने मराठा समाजाला‌ आरक्षण मिळावे म्हणून सातत्याने झुंजणारे खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉ.सुनील गोटीराम पाटील यांच्या झुंजार नेतृत्वामुळे खोपोली शहरातच नव्हे तर खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्याला झपाटून टाकणारे आंदोलन यशस्वीपणे पार पडले.आंदोलनाला राजकीय वास येवू नये यासाठी डॉ.सुनील पाटील यांनी आपल्या राजकीय पदाचा राजीनामा दिला,अनेकांनी यांचे राजकीय भांडवल करण्याचाही प्रयत्न केला असेल मात्र आपणास राजकीय नेतृत्वापेक्षा समाज महत्वाचा असल्याचे म्हणत त्यांनी आपल्या राजकीय,सामाजिक प्रवासाचा किंचितही विचार न करता राजीनामा देऊन आपली भूमिका स्पष्ट करत समाजासाठी कॅण्डल मार्च ते साखळी उपोषण आंदोलनाचे नेतृत्व केले.

                  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी मागील १८ ते २० वर्षापासून दिवंगत आमदार विनायक मेटे पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, छत्रपती  संभाजीराजे भोसले यांच्यासह मोठमोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलात सहभाग घेतला आहे.सध्या उपोषणास बसलेल्या मनोज रारंगे पाटील यांना पाठिंबा देत कोकणातील मराठा बांधवांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी यशस्वी नेतृत्व केले.या आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले होते.
             

              जारंगेंच्या सभेला सुद्धा ते उपस्थित होते यावरून त्यांना समाजाप्रती किती ओढ आहे ते स्पष्ट होते.कँडल मार्च, साखळी उपोषण अशा विविध प्रकारच्या आंदोलनाला खोपोली शहरातीलच नव्हे तर खालापूर तालुक्यातील समाज बांधवांचा अप्रतिम प्रतिसाद तर मिळालाच पण कर्जतसह  अन्य तालुक्यातही आंदोलनाचे लोण हळूहळू जिल्हाभरात पोहोचले आणि जिल्हा आंदोलनमय झाला हे डॉ.सुनील पाटलांच्या नेतृत्वाचे यश मानले जात आहे.
समाजासाठी उभारलेल्या आंदोलनापूर्वी त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीचे मार्ग बंद करून टाकले.

          उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सदस्यत्वासह सर्व महत्त्वाच्या जबाबदारी असलेल्या पदांचा राजीनामा देऊन डॉ.सुनील पाटील यांनी राजकीय वातावरणात मोठी खळबळ तर निर्माण केलीच, पण आंदोलनाला व्यापक, सर्वपक्षीय स्वरूप मिळवून देण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले.
दिवंगत आमदार विनायक मेटे पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, छत्रपती  संभाजीराजे भोसले यांच्यासह मोठमोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने यशस्वी करणारे डॉ.सुनील पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी निर्माण केलेल्या झंझावातात स्वतःला झोकून दिले आणि हे आंदोलन खालापूर तालुक्यातील जनतेपर्यंत  नेण्यात त्यांनी सिंहांचा वाटा उचलला.

                   आपण आता कोणत्याही राजकीय पक्षात नसून जास्तीत जास्त विधायक व संघटनात्मक कार्य करणार आहोत असे डॉ.सुनील पाटील यांनी स्पष्ट केल्याने मराठा समाज बांधवांचा डॉ.सुनील पाटील यांच्यावरील विश्वास द्विगुणित झाल्याचे पहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन