खालापूर प्रेस क्लबची ज्येष्ठ नागरिकांसमवेत देव दिवाळी साजरी
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : ३ डिसेंबर
रायगड प्रेस क्लब संल्गन असलेल्या खालापूर प्रेस क्लबने सालाबाद प्रमाणे या ही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठ नागरिकांबरोबर देव दिवाळी समारंभ शनिवार दि.२ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ज्येष्ठ नागरिकांसमवेत फराळ खाऊन फटाक्या फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी केले.ज्येष्ठ नागरिकांसोबत देव दिवाळी हा समारंभ ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद पाठीशी राहावेत हाच मुख्य उद्देश असल्याचे सांगत दरवर्षी ज्येष्ठ नागरिकां समवेत सांगितले.
देवदिवाळी कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सकल मराठा राज्य समन्वयक डॉ.सुनिल पाटील, माजी नगरसेवक अमोल जाधव, ज्येष्ठ संघाचे माजी अध्यक्ष एन.बी.जाधव, अल्टा लँब्रुरिटीज कंपनीचे प्रधान आदीसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.
खालापूर प्रेस क्लबने ज्येष्ठ नागरिक नागरिकांसाठी आयोजित केलेल्या देव दिवाळी कार्यक्रमाचे कौतुक करीत खोपोली पोलिसांच्या वतीने ज्येष्ठांसाठी कार्यक्रम करणार असल्याचे पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांनी सांगत ज्येष्ठ नागरिकांपैकी कोणाचीही मुले परदेशात असतील त्यामुळेच ते एकटे राहत असल्यास त्यांची नावे,मोबाइल नंबर पोलिस ठाण्यात द्या त्यांच्या मदतीसाठी पोलिस २४ तास उपलब्ध असतील असा विश्वास राऊत यांनी दिला आहे.
खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील पत्रकार सामाजिक बांधिली जपणारे आहे. खालापूर प्रेस क्लब वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवित असल्याची सकल मराठा राज्य समन्वयक डॉ.सुनिल पाटील यांनी सांगितले.ज्येष्ठ नागरिकांसाठी नगराध्यक्ष असताना ज्येष्ठ नागरिक सभागृह उपलब्ध करून दिला आहे. आपण आपली संघटना वाढवा. तुमच्या आम्हाला आईवडीलांचे प्रेम दिसत असल्याचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकरांनी बोलताना सांगितले.
माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांना पाच हजार रोख रक्कम भेट दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी अभार व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सल्लागार भाई ओव्हाळ, कार्याध्यक्ष अनिल पाटील, सचिव रवींद्र मोरे, उपाध्यक्ष एस.टी.पाटील, काशीनाथ जाधव, खजिनदार समाधान दिसले, प्रसिध्दीप्रमूख नवज्योत पिंगळे, सहसचिव बंटी सालुखे, सहखजिनदार संतोषी म्हात्रे व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक व रविंद्र प्रसिद्ध निवेदक रवींद्र घोडके यांनी केले.
0 Comments