स्थानिकांना खालापूर एक्सप्रेस टोलनाकावर वाहनांना सवलत मिळावी,यासाठी भाजपा युवा मोर्चा आक्रमक

 स्थानिकांना खालापूर एक्सप्रेस टोलनाकावर वाहनांना सवलत मिळावी,यासाठी भाजपा युवा मोर्चा आक्रमक





माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : ८ फेब्रुवारी,

         भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने आज खालापूर ( सावरोली ) टोल नाका मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे या ठिकाणी असलेले व्यवस्थापक यांस  खालापूर तालुक्यातील वाहनांना टोल सवलत मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.या परिसरातील टोल नाक्यावरून असंख्य वाहन हे स्थानिक असून त्यांना तिथे टोल सवलत मिळत नाही.मात्र ती मिळावी अशी भुमिका यावेळी घेण्यांत आली.
                    यामुळे खालापूर तालुका भाजप युवा मोर्चा आक्रमक भुमिका घेत खालापूर सावरोली टोल व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले.स्थानिक वाहनांना टोल सवलत मिळायलाच हवी अशी भूमिका भाजपा युवा मोर्चा खालापूर तालुका अध्यक्ष नागेश पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका व्यक्त केली.यावेळी टोलनाका व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा झाली.आम्ही  वरिष्टासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय लवकर देऊ असे टोलनाका व्यवस्थापकांने यावेळी  सांगितले. 
           यावेळी भाजपा खालापूर मंडळ अध्यक्ष सनी यादव, जिल्ह उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, मा.सभापती नरेश पाटील, युवा मोर्चा कर्जत विधानसभा संयोजक प्रसाद पाटील,खालापूर तालुका सरचिटणीस रविंद्र पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सुजाताताई दळवी,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील, हरीभाऊ जाधव, विशाल लोते, ज्ञानेश्वर पारांगे, दत्ताराम पाटील, लव्हेश कर्णूक, राहुल कडव, रोनीत म्हात्रे, दर्शन यादव, मोहन घाडगे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

विक्रम गायकवाड यांच्या अभिष्ठचिंतनास प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती,भावी सरपंच म्हणून कार्यकर्ते यांची ललकारी