अखेर फळपीक विमा योजनेस मुदतवाढ,शेतकऱ्यांच्या मागणीस शासनाकडून दाखल
पाताळगंगा न्यूज : कृष्णा भोसले
तळा सोनसडे : ३ डिसेंबर
बदलत्या हवामानच्या धोक्यांमुळे फळपीकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होवुन उत्पादनात घट येते असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सामोरे जावे लागत आहे.यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते आहे.
या वर्षी सुद्धा कोकणातील आंबा व काजू पिकासाठी विमा योजना सुरू होती. त्याच बरोबर,भाग घेण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ अशी होता.मात्र पीक विमा पोर्टल मध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे बरेच इच्छुक शेतकरी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले.त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली, त्यातच मागील वर्षीचे पीक विम्याचे मंजूर पैसे सुद्धा अद्याप मिळाले नाहीत.
यावर्षी विमा न उतरवता आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता व विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी तहसील कार्यलयावरती शेतकरी मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता.आता या मागणीची दाखल शासन स्तरावरून घेण्यात आली असून सदर शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टिकोनातून कोकणातील आंबा काजू या फळपिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक ०२-१२-२०२३ अन्वये दिनांक ०४ व ०५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची अतिरिक्त मुदत वाढ मंजूर केली आहे..
आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी वरील फळ पिकांसाठी ०४ व ०५ डिसेंबर २०२३ रोजी विमा योजनेत सहभागी होऊ शकतात.यासाठी तालुक्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तळा कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
0 Comments