हेल्थी हक्स हेल्थ केअर यांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी ,गृप ग्राम पंचायत माजगांव यांचा पुढाकार

 हेल्थी हक्स हेल्थ केअर यांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी ,गृप ग्राम पंचायत माजगांव यांचा पुढाकार 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली : ४ जानेवारी 

                    आजच्या धावपलीच्या जिवनात प्रत्येकाला विविध समस्या आजारांने ग्रासले आहे.मात्र त्यांचे वेळेवर निधान झाले नाही तर,विविध समस्यांचा सामना करावा लागतो.काही वेळा किरकोल आजार हा गंभीर रुप धारण करीत असतो.यामुळे नागरिकांची काळजी घेत एक पाऊल पुढे टाकत गृप ग्राम पंचायत माजगांव सरपंच दिपाली पाटील उप सरपंच राजेश पाटील आणी सदस्य यांच्या विचारांतून डॉ. खान ईमरान यांचे  हेल्थी हक्स हेल्थ केअर यांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी या परिसरातील शेकडो नागरिकांनी आपली तपासणी करुन घेतली.

        यावेळी टाच दुःखी ,मुरुम आणि डाग,मजकूर दुःखी,सुरकुत्या,पाठीचा कणा दुखणे,लठ्ठपणा,खांदा दुखणे,केस पडणे,सांधे दुखी,मूत्रपिंडातील असंतुलन,पॅरालीसीस,मधुमेही पाय,अनियमित मासिक पाळी,लैंगिक समस्या,तसेच फिजिओथेरेपी म्हणून पोषण आणि आहार,त्वचा आणि केसांची काळजी,फिटनेस वाढवणे,किगल्स लॅब,पेल्विक लय,डायबेटीस फिरवण्याचे कार्यक्रम क्रीडा कार्यक्रम अदि संदर्भात मार्गर्दशन तसेच तपासणी करण्यात आली.

       यावेळी नागरिकांची तपासणी करण्यासाठी -सेंटर व्यवस्थापक - जयश्री सोनखारटे,फिजो थेरपी - डॉ. दिपाली पाटील,गौरव भारती ,त्वचा तज्ञ - सारा खान,टेक्निशियन - सोहेल खान,रिसेप्शन - प्राजक्ता कांबळे

               तसेच गृप ग्राम पंचायत माजगांव सरपंच, दिपाली नरेश पाटील, उपसरपंच  राजेश शिवराम पाटील सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती उप सभापती खालापूर- जयवंत पाटील आर.पी.आय.जिल्हा अध्यक्ष - अविनाश कांबळे, तालुका प्रमुख - एकनाथ पिंगळे,उत्तमशेठ भोईर,विलास कांबळे,रमेश जाधव, मंगेश पाटील, रामचंद्र गायकवाड, किशोर पाटील, मारुती शेट पाटील, नितीन महाब्दी, राजेश महाब्दी,  मा. सरपंच- मथुरा वाघे,  गौतम कांबळे सर,अरुण काठवले नरेश पाटील एकनाथ ढवाळकर,प्रवीण काठवले,दिलीप काठवले, रवी पाटील, महेंद्र ढवालकर, संदिप पाटील, नामदेव पाटील, पंढरीनाथ चाळके, बाबू वाघे, प्रवीण पाटील, भरत पाटील, मॅचिंद्र पाटील, किरण कांबळे,कृष्णा कांबळे, अशोक काठवले व अदि मान्यवर ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन