रस्त्यावर बसविलेला पथदिवे यांची बत्तीगुल ,मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी केली नाराजी व्यक्त

 रस्त्यावर बसविलेला  पथदिवे यांची बत्तीगुल ,मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी केली नाराजी व्यक्त 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली १९ जून ,

            गृप ग्राम पंचायत माजगांव हद्दितील आंबिवली येथिल रस्त्यालगत मोठा असा पथ दिवे बसविण्यांत आले.मात्र मागील महिन्यापासून हे पथ दिवे बंद असल्यामुळे येथिल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे.विषेश म्हणजे या पथ दिवे यांची चाचणी घेण्यासाठी हे दिवे मध्यांतरी लटकलेल्या अवस्थेत असल्यामुळे हे केव्हा उजेड देणार असा प्रश्न सध्या ग्रामस्थांच्या पुढे निर्माण झाला आहे.
             गावामध्ये अनेक ठिकाणी हे पथदिवे आहे.मात्र आंबिवली येथिल असलेले पथदिवे बंद स्वरुपात असल्यामुळे हे केव्हा उजेड देणार या कडे सर्वांचे लक्ष्य वेधले गेले आहे.ह्या ठिकाणी सावरोली खारपाडा रस्ता असल्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोणातून हे दिवे लावण्यांत आले.या ठिकाणी अंधार असल्यामुळे बसविण्यांत आले होते.शिवाय हे पथ दिवे एका लाईन मध्ये सात ते आठ एकाच खांबावर असल्यामुळे १० ते बारा फुटावर हे टांगते ठेवण्यांत आले आहे. 
            त्याच बरोबर पावसाळ्यात आंबिवली येथिल काही घरामध्ये विजेचा प्रवाह अल्प प्रमाणात येत असल्यामुळे,घरातील उपकणे नादुरुस्त होण्यांची दाट शक्यता वर्तवली जात आहे.मात्र ग्रामस्थांची समस्या विचारात घेण्यासाठी ग्रामपंचायत जाणिव पुर्वक दुर्लक्ष्य करीत असल्यांचा आरोप येथिल ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.

चौकट 

       हे पथदिवे मेढा योजने अंतर्गत बसविण्यांत आले असून ज्या कॉट्रेक्टर जे काम दिले आहे.ते आमचा फोन रिसिव्ह करीत नाही.यामुळे हे काम थांबले आहे.मात्र आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत  (ग्रामसेवक गृप ग्राम पंचायत माजगांव -  संदिप धारणे )


 चौकट : 
              आंबिवली येथिल स्टॉप वर पथदिवे बसविण्यांत आले.मात्र अजूनही ते बंद स्वरुपात आहे.गेले अनेक दिवस याच स्थितीत आहे.त्याच बरोबर हे पथ दिवे मध्यातरी लटकलेल्या स्थितीत ठेवण्यांत आले.यामुळे अपघाताची समस्या निर्माण होवू शकते 
( मा.सरपंच गोपीनाथ जाधव 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर