पिण्यासाठी दुषिद्ध पाणी,ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष,पौध,माजगांव वाडीतील अदिवासी संतप्त

 पिण्यासाठी दुषिद्ध पाणी,ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष,पौध,माजगांव वाडीतील अदिवासी संतप्त 





पाताळगंगा न्यूज  : वृत्तसेवा 
माजगांव /आंबिवली  : ४ फ्रेब्रूवारी,

          पाणी म्हणजे जिवन आहे.प्रत्येकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे,यासाठी जल जिवन मिशन योजना राबवली जात आहे.मात्र पौध आणी माजगांव अदिवासी वाडीतील ग्रामस्थांना अशुद्ध पाणी मिळत असल्यामुळे नाराजीचा सुर उमठत आहे.या अदिवासी बांधव यांची विहीर पौध येथिल येथिल पुर्वीचे नाव सनुज स्टिल तसे आता असलेले कॉनफिडन्स पेट्रोलियम असलेल्या कारखान्यांच्या आत मध्ये असल्यामुळे या विहीरीची दुरावस्था निर्माण झाली आहे.यामुळे अनेक वर्ष हे अदिवासी बांधव दुषिद्ध पाणी पित असल्यामुळे विविध आजरांचा सामना करावा लागत आहे.

             स्वतंत्र होवून अनेक वर्ष झाली.मात्र आजही डोंगर द-या खो-यात राहणारे मुलभूत सुविधा पासून वंचित आहे.ही शोकांतिका आहे.गेली अनेक वर्ष ग्रामपंचायत या अदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नारजीचा सुर उमठत आहे.या पाण्याला उग्र वास,तसेच तेलाचे तवंग निर्माण होत असल्यामुळे हे पिण्यायोग्य नसल्यांचे निदर्शनास येत आहे.मात्र पिण्यासाठी पाणी कोठून आणार या विचारांतून यांच पाण्यावर तहान भागविली जात आहे.
             

   गेली अनेक वर्ष ही विहीर या कारखान्याच्या आत मध्ये असल्यामुळे साहजिकच हे पाणी सातत्याने दुषिद्ध होत आहे.ही विहीर जरी साफ केली गेली तरी काही दिवसातच पुन्हा हे पाणी खराब होत आहे.आणी पुन्हा या पाण्यावर तेलांचे तवंग निर्माण होत असून हेच पाणी या अदिवासी बांधवांपर्यंत पोहचविले जात आहे.विषेश म्हणजे ग्राम पंचायत सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे या संतप्त कारभाराविषयी महादु वाघे,बाबू जाधव,मथुरा वाघे,मोतीराम वाघे,यशवंत वाघे,कान्हू मुकणे,राम वाघुळे तसेच येथिल ग्रामस्थांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

चौकट : 

       गेले अनेक वर्ष पौध आणी माजगांव अदिवासी वाडीला दुषिद्ध पाणी पुरवठा होत आहे.यामुळे या पाण्यापासून घसा खवखविणे,तसेच मळमणे,तसेच शारिरिक आजार निर्माण होत असून, या कडे ग्राम पंचायत साफ दुर्लक्ष करीत करीत आहे.यामुळे आम्हाला तहान भागविण्यासाठी या पाण्यांचा दैंनदिन जिवनात उपयोग करावा लागत आहे. ( नामदेव  वाघे - ग्रामस्थ,माजगांव अदिवासे वाडी  )

चौकट 

        ही विहीर कारखान्यामध्ये असल्यामुळे कदाचित हे पाणी दुषिद्ध झाले असेल.मात्र या संदर्भात येथिल अदिवासी बांधव अथवा ग्रामपंचायत यांनी आम्हास कळविले नाही,जर विहीरींचे पाणी दुषिद्ध झाले असेल तर विहीर साफ करुन दिले जाईल.
व्यवस्थापक कॉनफिडन्स पेट्रोलियम: रमेश देशमुख 


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर