घोडीवली येथील तरुणांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश....

 घोडीवली येथील तरुणांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश....


मा.जिल्हा परिषद सभापती  नरेश पाटील व कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दादा ठाकरे 

यांच्या नेतृत्वाखाली घोडीवली येथील तरुणांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश....

कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात भाजपला अच्छे दिन..



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : ७ फ्रेब्रूवारी,

                   खालापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षात रोज होत असलेल्या प्रवेशाने भाजपला कर्जत खालापूर विधानसभेत अच्छे दिन आलेत असे बोलले जात आहे.  मावळ लोकसभा मतदार संघांचे निवडणूक प्रमुख तथा कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर व मा.आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रायगड जिल्हा मा.सभापती नरेश पाटील यांच्या व कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपा किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत आज घोडीवली येथील तरुणांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.                                                        रुपेश नागेश फराट, निखिल जनार्धन फराट, प्रज्वल प्रकाश पिंगळे, वैभव गणपत पिंगळे,स्वप्नील जनार्धन फराट, शरद गणपत पिंगळे, रवींद्र जानू जाधव , विलास बळीराम पिंगळे, गणेश दूंदाजी पिंगळे, गणेश जानू जाधव, संजय रघुनाथ देवकर,सागर विठ्ठल परबलकर आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
                 यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष  सनी यादव,  ऋषिकेश जोशी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा, कर्जत खालापूर विधानसभा युवा मोर्चा संयोजक  प्रसाद पाटील, भाजपा खालापूर शहर अध्यक्ष  दिपक जगताप, विनोद खवले साजगाव ग्रामपंचायत सरपंच, रोहिदास पाटील खालापूर शहर चिटणीस,राजेश ठाणगे, मयूर लाड,विशाल कोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर