खासदार श्रीरंग बारणेंच्या विजयात राष्ट्रवादीचा महत्वाचा सहभाग असेल राष्ट्रवादीचे नेते : सुधाकर घारे
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ५ मे,
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने आपण महायुतीत सहभागी आहोत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला श्रीरंग बारणे यांना मतदान करायचे आहे, खासदार श्रीरंग बारणेंच्या विजयात राष्ट्रवादीचा महत्वाचा सहभाग असेल असे मत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचा संवाद मेळावा कर्जत येथे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी संवाद मेळाव्यात बोलतांना व्यक्त केले.
या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांची होती. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विजयात कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचा महत्वाचा सहभाग राहणार असून श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले असून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना मतदान करुन निवडून आण्यांची जबाबदारी आपली आहे.
कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला वर्गाने ही निवडणूक हातात घेतली असून श्रीरंग आप्पा बारने यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागली आहे, तर येणाऱ्या ४ जूनच्या निकालात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विजयात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा महत्वाचा वाटा असेल असेही प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केले आहे.
0 Comments