सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे यांनी केली खंत व्यक्त लग्नाच्या जेवणात अन्नाची नासाडी! अन्न हे पूर्णब्रह्म' चा विसर,भुक नसो पण ताटात असो

 सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे यांनी केली खंत व्यक्त 


लग्नाच्या जेवणात अन्नाची नासाडी! अन्न हे पूर्णब्रह्म' चा विसर,भुक नसो पण ताटात असो 



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
पाताळगंगा : ३ मे ,

              लग्न सोहळा असो की अन्य कोणताही कार्यक्रम या कार्यक्रमात जेवणावळी आल्याच.आता तर, बदलत्या काळात जेवणावळीचे स्वरुपही बदलत चालले आहे. पंगतीत बसून जेवण करण्याची प्रथा आता आजच्या धावपळीच्या युगात मागे पडून पंगतीची जागा आता बुफे पद्धतीने घेतली आहे. प्रगत समाजाची ओळख बनू पाहत असलेल्या या पद्धतीमुळे 'अन्न वाया जात असून अन्न हे पूर्णब्रह्म' चा विसर पडत आहे.
                  कार्यक्रम आटोपल्यावर कार्यक्रम स्थळाच्या आजूबाजूला उष्ट्या अन्नाचे ढिग दिसून येतात.
एका लग्न समारंभाला सरासरी एक ते दोन हजार लोक हजर असतात. बुफे पद्धतीमुळे रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. मात्र आवश्यकतेपेक्षा ताटात जास्त अन्न घेतल्यामुळे ते वाया जाते. एका बुफे जेवणाच्या कार्यक्रमात कितीतरी लोकांचे अन्न वाया जाते. हे अन्न मग फेकून त्याची विल्हेवाट लावली जाते. उकिरड्यावर फेकलेले अन्न सडल्यामुळे दुर्गंधी पसरली जाते.

                अन्न हे पूर्णबह्म आहे,असे म्हणनार्‍या आपल्या देशातच अनेकांना रात्री उपाशीपोटी झोपावे लागत आहे. गरीब व्यक्ती आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो. त्याच देशात अन्न फेकुन दिल्या जाते ही शरमेची बाब आहे.लग्न समारंभात गर्दी असल्याने येथे येणारे नागरिक पुन्हा रांगेत लागण्याच्या भानगडीत न पडता एकाच वेळी पूर्ण प्लेट भरून घेतात. यात आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न घेतल्या गेल्याने ते त्यांच्या खाण्यात जात नाही. पर्यायी ते अन्न प्लेटमध्ये तसेच टाकण्यात येते. येथूनच अन्नाची नासाडी सुरू होते. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण