इंजिन मध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्कोडा गाडीला आग,वहानांचे मोठे नुकसान
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : ११ जुलै,
मुंबई - पुणे एक्सप्रेस या मार्गावर निरंजन अनिल फणसे हा आपल्या जवळ असलेली स्कोडा गाडी घेवून पुणेकडे जात असतांना इंजिन मध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्कोडा गाडीला आग लागली.सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी सुद्धा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या सुत्राच्या माहिती नुसार,काल रात्री ८ : २५ वाजण्याचे सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वे पुणे लेनवर ३०.३०० या ठिकाणी स्कोडा कार क्र. MH-१४ CS -४४१२ चा चालक निरंजन अनिल फणसे वय -४२ रा - सिहंगड रोड - पुणे हा ठाणेकडून ते पुणेकडे जात असताना गाडीचे इंजिन मध्ये शॉर्ट सर्किट होऊन गाडीने पेट घेण्यास सुरुवात केली.
मात्र प्रसंग अवधान राखून त्यांनी तात्काळ वहान थांबवून त्याने त्यांची कार रस्त्याचे बाजूला घेतली व तात्काळ व आय आर बी कंट्रोलला संपर्क करून मदत मागितली.यावेळी आय आर बी फायर ब्रिगेड, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा टोल प्लाजा - खालापूर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
0 Comments