हाळ गावाजवळ दुचाकीला दिली अज्ञात वाहनाने जोरदार धडक,युवकाचा जागीच मृत्यू
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे खालापूर : ११ जुलै,
मुबंई पुणे जुन्या महामार्गांवर हाळ गावाजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे, मुबंई पुणे जुन्या महामार्गवरून खोपोलीहुन पनवेल कडे ऍक्टिवा दुचाकी घेऊन ओंकार सुभाष आडकर( रा विनानगर खोपोली )हा युवक आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन येत असताना तो हाळ गावाजवळ आला असता दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर अज्ञात वाहन अपघात करून पळून गेले असल्याची माहिती मिळाली आहे, सदर युवकाचा मृतदेह खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे,
0 Comments