एक पेड मां के नाम,मेरी लाईफ कार्यक्रमांतर्गत,राजिप शाळा वडगाव,येथे नोव्होझाइम्स कंपनीचा पुढाकार,वृक्ष व मुलांना खाऊचे वाटप
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगाव : १० जुलै,
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव व नोव्होझाईम्स या कंपनी च्या संयुक्त विद्यमाने ECO Clubs Mission Life मेरी लाईफ कार्यक्रमांतर्गत एक पेड मां के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी सर्व विद्यार्थ्याना वृक्षाचे रोपटे त्यांच्या आई सोबत देण्यांत आले.पर्यावरणीय समतोल राखण्याचे आव्हान पुढील पिढी समोर आहे,त्यासाठी प्रत्येकांने आतापासूनच झाडे लागवड केली पाहिजे या उद्दात विचारांतून एक झाड आईसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माता पालक व पाल्य यांना झाड लावणे व त्याचे संवर्धन करण्याची शपथ देण्यात आली.शाळेच्या परिसरात काही झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच पर्यावरण संरक्षणासाठी धडे गिरवावे असे गौरउद्गगार PIS धोंडे यांनी यावेळी काढले.वाढती जागतिक उष्णता व पर्यावरणाचा ढासळत असलेला समतोल,तसेच पाणी पातळी वाढविणे याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे,या हेतूने नोव्होझाईम्स कंपनीने पुढाकार घेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला.
यापूर्वी तीन दिवसात १००० झाडे कंपनीने लागवड केली असून वडगाव शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी यांनी १२५ वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प केला.याप्रसंगी रसायनी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मा.महेश धोंडे,पोलीस निरीक्षक-मिनल शिंदे,मा.सरपंच.गौरीताई महादेव गडगे,मा.उपसरपंच महादेव गडगे,नोव्होझाईम्स कंपनीच्या CSR हेड - मिनल गडगे तसेच कंपनीचे अधिकारी, तसेच लोहोप च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अंकिता म्हात्रे,विषय साधन व्यक्ती नरेश पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा करुणा ठोंबरे,उपाध्यक्षा राजश्री जांभूळकर पालक,माता पालक व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
चौकट
गेल्या शैक्षणिक वर्षात २०२३-२४ मध्ये शाळेने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत ७५ झाडे लागवड करुन संवर्धन सुरु आहे.माझ्या शाळेतील प्रत्येक घटकावर पूर्ण विश्वास असून यावर्षी १२५ झाडे लागवड व संवर्धन आमचा ध्येय आहे.
.सुभाष राठोड,मुख्याध्यापक,शाळा वडगाव
0 Comments