खालापूर प्रेस क्लबने प्रगतशिल शेतक-यांचा शेताच्या बांधावर जावून केला सत्कार शिवाजी ठाकूर व अर्पिता पाटील या शेतकऱ्यांचा गौरव

 खालापूर प्रेस क्लबने प्रगतशिल शेतक-यांचा शेताच्या बांधावर जावून केला सत्कार 

शिवाजी ठाकूर व अर्पिता पाटील या शेतकऱ्यांचा गौरव 




पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले 
खालापूर : १२ जुलै,

          जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाचा दरवर्षी पावसाळ्यात शेतक-यांच्या शेताच्या बांधावर जावून रायगड प्रेस क्लब संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लब सत्कार समारंभ करीत असताना यावर्षी ही खालापूर प्रेस क्लबच्या वतीने १२ जुलै रोजी खालापूर तालुक्यातील वयाल येथील शेतकरी शिवाजी ठाकूर तसेच परखंदे येथील महिला शेतकरी अर्पिता पाटील यांचा शेताच्या बांधावरती आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                                     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ सल्लागार भाई ओव्हाळ, प्रविण जाधव, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष तथा रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, कार्याध्यक्ष अनिल पाटील, सचिव रविंद्र मोरे, उपाध्यक्ष एस.टी पाटील, ग्रामीण उपाध्यक्ष काशिनाथ जाधव, खजिनदार समाधान दिसले, सहखजिनदार संतोषी म्हात्रे, सहसचिव राज साळुंके, प्रसिद्धी प्रमुख नवज्योत पिंगळे आदिनी मेहनत घेतली. तर शेतकरी शेतामध्ये जीवापाड मेहनत करून धान्य पिकवित असतो, उन्हाची आणि पावसाची तमा न बाळगता तो सतत धडपडत असतो. म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते. अशा दोन प्रगतशील शेतक-यांचा खालापूर प्रेस क्लबच्या वतीने झाड, शाल, सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.   

                   
                                          वयाल येथील असलेले शेतकरी शिवाजी काथोर ठाकुर यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय, कुकुट पालन, भाजीपाला पिकवणे, शेतात विविध प्रकारचे कडधान्ये व पाळीव पशु साठी लागणारे अन्न हे शेतात पिकविले आणि वृक्ष लागवड केली आहे.
           तसेच वावोशी परिसरातील परखंदे मधील अर्पिता अमित पाटील यानी महिला असताना शेती टिकून ठेवली असून दूग्ध व्यवसाय, विविध प्रकारचे कडधान्ये, भाजीपाला लागवड, वृक्ष लागवड, नाचनी, भेंडी, सूर्यफुल आदी उपक्रम शेतात राबविल्यांने त्यांच्या या शेती व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत खालापूर प्रेस क्लबने १२  जुलै रोजी गौरव करण्यात आला. 


            यावेळी टेंभरी सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच निखील पाटील, माजी उपसरपंच रोशन गायकवाड, सदस्य महेंद्र मोरे, योगेश फाटे,अपर्णा पवार, ग्रामसेवक गोकुळदास राठोड, कृषी परिवेक्षक नितीन महाडिक, कृषी सहाय्यक सुमित भगत, रवींद्र देशमुख तसेच होराले सरपंच निललम भूईकोट, उपसरपंच नागेश पाटील, सामजिक कार्यकर्ते शंकर मानकवले, ललिता जाधव, सुरेखा दळवी, वैशाली खराडे, अविराज बुरूमकर, पत्रकार बाबू पोटे, हनुमत मोरे, संदिप ओव्हाळ, अर्जुन कदम, सारिका सावंत, संतोष शेवाळे आदी प्रमुखा सह मोठया संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन