टेंभरी ग्रूप ग्राम पंचायत उप सरपंचपदी निखिल बाळाराम पाटील यांची बिनविरोध निवड

 टेंभरी ग्रूप ग्राम पंचायत उप सरपंचपदी निखिल बाळाराम पाटील यांची बिनविरोध निवड, कार्यकर्त्यानी फटाक्याची आतषबाजीत,जल्लोष 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
टेंभरी  : १२ जुलै,

                  खालापुर तालुक्यातील ग्रूप ग्राम पंचायत टेंभरी उपसरपंच पदावर निखिल बाळाराम पाटील ह्यांची खेळी मेळीच्या वातावरणामध्ये एकमताने बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे सर्व स्थरातून कार्यकर्ते आणी महिला वर्ग यांनी अभिनंदन केले.या अगोदर उप सरपंच पदाचा कार्यभाग रोशन गायकवाड हे सांभाळीत होते.मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होतच उप सरपंच पदाचा राजीनामा देण्यात आला.
                      प्रत्येकाला जनतेची सेवा कराला मिळावी दृष्टीकोनातून पदभार सांभाळण्याचे नियोजन आखण्यात आल्याने गायकवाड यांनी सांगितले.यावेळी ते उपसरपंच पदाचा कार्यकाल सांभाळत होते.मात्र ठरल्या प्रमाणे वर्ष पुर्ण होताच आपल्या पदाचा राजीनामा देण्यात आला.यावेळी रिक्त झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा आयोजित करण्यात आली.ग्रुप ग्राम पंचायत टेंभरी सरपंच रमेश गायकवाड, उप सरपंच रोशन गायकवाड, ग्रामसेवक गोकुळदास राठोड सदस्या -प्रतिभा भोईर,दर्शना फाटे,अंजना भोईर,अपर्णा पवार,निताली बामणे,आशा कातकरी,स्वपना ठोंबरे, सदस्य - रोशन गायकवाड,जनार्दन मुकणे,निलेश ठोंबरे,यांच्या सर्वांच्या मते उपसरपंच पदासाठी निखिल पाटील ह्यांचे नाव सुचविले,यावेळी सर्वांनी त्यांची एकमताने निवड करण्यात आली.
                    या प्रसंगी या परिसरातील  शेकडो कार्यकर्ते,मान्यवर उपस्थित होते.निखिल पाटील उपसरपंच पदि बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर होताच, बाहेर जमलेल्या  कार्यकर्त्यानी फटाक्याची आतषबाजी करत एकच जल्लोष करण्यांत आला.आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

ज्योतिष,वास्तु राष्ट्रीय महा अधिवेशनात महेश निमणे यांस वास्तुश्री पुरस्कारांने सन्मानित