उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थे अंतर्गत अलिबाग मधील नागाव वरंडे येथे प्रथमच ज्येष्ठ नागरिक हॉस्टेलची सुरुवात

 उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थे अंतर्गत अलिबाग मधील नागाव वरंडे येथे प्रथमच ज्येष्ठ नागरिक हॉस्टेलची सुरुवात




  पाताळगंगा न्यूज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : ८ जुलै,

                   उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबाग अंतर्गत रायगड मधील अलिबागपासून १२ किलो मिटर अंतरावर नागाव वरंडे या निसर्गरम्य वातावरणात प्रथमच भव्यदिव्य व अनेक सुखसोयींनी युक्त अशा ज्येष्ठ नागरिक हॉस्टेलची सुरुवात करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबाग संचलित सहजानंद आध्यात्मिका गोपाळ निवास या ज्येष्ठांच्या हॉस्टेलचे उद्घाटन  ७ जुलै रोजी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तसेच भारतीय पॅराओलंपिक क्रीडा चेअरमन मेधा सोमैय्या, ॲड.संध्या सुभाष कुलकर्णी, जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी,व्यावसायिक भरत तन्ना यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
                ज्येष्ठांचे हॉस्टेल श्रीशारदा ऑटोमोबाईल सीएनजी पेट्रोल पंपाच्यामागे महालक्ष्मी मंदिर नागाव वरंडे येथे असलेल्या निसर्गरम्य वातावरणात डॉ. चिखलकर यांच्या  जागेत स्थित आहे.उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा उज्ज्वला भालचंद्र चंदनशिव चव्हाण यांच्या संकल्पनेतून व डॉ. नितीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठांचे हॉस्टेलची संकल्पना समोर साकारण्यात आली. 
                  यामध्ये ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक जे चालते फिरते चांगल्या तंदुरुस्ती मध्ये आहेत,अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉस्टेल ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तीन वर्गीकरण करण्यात आले आहेत त्यांची त्या पद्धतीने सेवा करण्यात येईल. चालणारे फिरणारे तंदुरुस्त जेष्ठ नागरिक, त्यानंतर कोणत्याही आजाराशिवाय फक्त झोपून असणारे ज्येष्ठ नागरिक व जे अंथरुणाला खिळलेले आजारी आहेत असे ज्येष्ठ नागरिक अशा तीन प्रकारात विभागणी करून प्रत्येकांची सेवा करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी सांगितले. 
              या कार्यक्रमास संस्थेचे संचालक संदेश चव्हाण, रोशन पंडित, डॉ राजाराम हुलवान, अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशन तर्फे डॉ समीर बागडे, रायगड मेडिकल असोसिएशन संपादक प्रमुख डॉ अमर पाटील, सरस नर्सिंग होमचे डॉ सिद्धार्थ कुलकर्णी , डॉ. काशिनाथ स्वामी, व्यावसायिक सिद्धेश लोहार, निवृत्त वरसोली शिक्षक वाघमारे,  तेजस्विनी सामाजिक संस्था अध्यक्षा जीविता पाटील, प्राध्यापिका रुतिषा पाटील, विनोदी कलाकार योगेश पवार, उज्ज्वल भविष्य समन्वयक कुमार ठाकूर, सहजानंद ज्येष्ठांचे हॉस्टेल व्यवस्थापक ऋषिकेश वाडकर तसेच विविध मान्यवर, ग्रामस्थ,  उपस्थित होते. असिस्टंट नर्सिंग कोर्सचे विद्यार्थी उपस्थित होते.
                     प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.उज्ज्वल भविष्य सहाय्यक असिस्टंट रिंकू यांनी सर्वांचे स्वागत केले व उत्तमरीत्या सूत्रसंचालन करत सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण