क्रिकेट महोत्सवात,असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

 क्रिकेट महोत्सवात,असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : ८ एप्रिल,

           खालापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने टेनिस क्रिकेट महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या मध्ये खालापूर तालुक्यातील एकूण ४० संघांनी सहभाग घेतला असून अतिशय सुंदर नियोजन भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांची या क्रिकेट सामने यांस उपस्थिती दर्शवली असतात.यांच मंचावर या खालापूर तालुक्यातील असलेल्या असंख्य कार्यकर्ते यांनी हातात कमल घेवून पक्ष प्रवेश केला.
                   यावेळी खालापूर तालुका प्रभारी मंडल अध्यक्ष सनी यादव व कर्जत विधानसभा युवा संयोजक प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली  ग्रुप ग्रामपंचायत उंबरे येथिल मधील हरेश पाटील, सत्कार पाटील, ओंकार पाटील, विराज पाटील, धीरज पाटील, राजेश पाटील, गणेश पाटील, वैभव पाटील, अनिल पाटील सुनील पाटील , अनिकेत पाटील, मंगेश पाटील, रमेश पाटील , जगदीश आखाडे, भरत आखाडे, बाळाराम आखाडे यांनी तर खालापूर नगर पंचायत मधील महड येथील निलेश पाटील,जयेश पाटील, अविनाश पाटील, नितेश पाटील यांनी कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला.
              भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल.असे गौर उदगार आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हणाले.यावेळी जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले, तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील, विकास रसाळ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील, खालापूर शहर अध्यक्ष दिपक जगताप, हरिभाऊ जाधव, आबा देशमुख , प्रवीण पाटील महड बूथ अध्यक्ष, हेमंत पाटील आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments

माजगाव येथे हनुमान जन्मोत्सव  मोठ्या उत्सहात  साजरा