कु.पवित्रा राकेश कदम हिने पटकावले तायकांडो कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

 कु.पवित्रा राकेश कदम हिने पटकावले तायकांडो कराटे स्पर्धेत सुवर्णपदक



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : ९ जुलै,


           रिलायन्स फाउंडेशन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, लोधिवली मध्ये शिकत असलेल्या  पवित्रा राकेश कदम हिने कळंबोली येथे ७ जुलै रोजी झालेल्या २३ व्या राज्यस्तरीय तायकांडो कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले असून आत्तापर्यंत पवित्रा हिने जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये आठ सुवर्णपदके मिळविली आहेत. या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून पवित्राचे वडील राकेश कदम यांची चौक परिसरात निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख आहे.
            तर सुभाष पाटील व शैलेश कदम हे पवित्रा कदम हिला कराटेचे प्रशिक्षण देत आहे.आज सर्वत्र ठिकाणी कराटे खेळाचे महत्व पटवून देत तरुणींन बरोबर तरुणांना संरक्षणाचे धडे शिकवले जात आहेत. त्यामुळे या खेळाच्या माध्यमातून असंख्य तरुण - तरुणींनी आपल्या स्वःत बरोबर कुटुंबाचे संरक्षण करीत असताना या तरुणांमधील दडलेले कराटे वृत्ती चालना मिळावी या दृष्टीने विविध स्तरावर कराटे स्पर्धेचे आयोजन करीत यांना प्रोत्साहीत करण्यात आहे. 
       

  याच अनुषंगाने कळंबोली येथे ७  जुलै रोजी २३  व्या राज्यस्तरीय तायकांडो कराटे स्पर्धा पार पडली असता या स्पर्धेत खालापुर तालुक्यातील चौक परिसरातील ग्रामीण भागातील वांवढळ गावातील पवित्रा राकेश कदम हिने आपले खिलाडूवृत्ती दाखवत सुवर्णपदक पटकावल्याने वांवढळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा पवित्रा कदम च्या माध्यमातून रोवला गेला आहे.
आतापर्यंत पवित्रा कदम हिने सलग आठ सुवर्ण पदक पटकावले आहेत.ह्या यशा बद्दल पवित्रा हिचे चौक विभाग तसेच खालापूर खोपोलीतून कौतुक होत आहे. मावळ मतदार संघातून खासदारकिची निवडणुक लढवलेले संजोग वाघेरे पाटील आणि पवित्रा हिचे व तिच्या वडिलांचे कौतुक करत पवित्रा हिस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच आगामी काळात बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु पवित्रा राकेश कदम हिची निवड झाली आहे.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण