डॉक्टरांना वैद्यकीय उपकरण ,पोलीस कार्यालयास बॅरिकेटर्स चे वाटप , डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ७ एप्रिल,
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्यांने व जेष्ठ निरुपणकार डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथिल महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी खालापूर तालुक्यातील असलेल्या ग्रामीण रुग्णालयांत काम करणारे डॉक्टर यांस वैद्यकीय उपकरण तसेच पोलीस स्टेशन येथे शंभर बॅरिकेटर्स चे वाटप करण्यांत आले.यावेळी बहुसंख्येने श्री सद्स्य तसेच वैद्यकीय आणी पोलीस ठाण्यातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन,रक्त दान शिबीर,शासकीय कार्यालय रस्ते,शाळा स्वच्छता अभियान,जल संवर्धन व स्वच्छता अभियान,स्मशानभुमी,नैसर्गिक जल स्त्रोत्राचे झरे जिवंत करणे,पुरग्रस्तांसाठी मदत,विविध प्रकारचे दाखले वाटप, असे विविध उपक्रम प्रतिष्ठांच्या माध्यमातून राबविण्यंत येत असून एक पाउल पुढे टाकत हा उपक्रम हाती घेण्यांत आला.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत,खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, खोपोली डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सतीश जाखोटीया, सेक्रेटरी डॉ.नलीन शहा, नायब तहसीलदार विकास पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल कुमार शहा, डॉ.सूरज तडवी, सामाजिक कार्यकर्ते विक्रम साबळे व्यासपीठावर उपस्थित होते.
0 Comments