विद्यार्थ्यांनी केली तंबाखू मुक्तीची जनजागृती,सलाम मुंबई फाउंडेशन कडून राजिप शाळा वडगाव यांस सन्मानपत्र
पाताळगंगा नुज : वृत्तसेवा
वडगाव : १४ ऑगस्ट,
नश्यायुक्त पदार्थ शरीरास हानिकारक असून त्यांचे सेवन केल्यांस आपणांस विविध आजारांस सामोरे जावे लागते.यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथिल विद्यार्थी आणी शिक्षक यांनी मोहीम हाती घेवून ग्रामस्थांच्या मध्ये जनजागृती करण्यांत आली.यावेळी विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्तीचे प्रयत्न,तसेच रॅली,पथनाट्य, पोस्टर्स व चित्रकला स्पर्धा घरोघरी जाऊन महत्त्व पटवून देणे, तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगणे,तंबाखू मुक्त शाळा,असे अनेक उपक्रम राबविल्यामुळे सलाम मुंबई फाउंडेशन या शाळेस सन्मानपत्र देण्यांत आले.
शासनांच्या माध्यमातून शरिरास हनिकारक असलेले पदार्थ सेवन करु नका असे अनेकदा सागण्यांत येत असते.मात्र या कडे अनेक जण दुर्लक्ष्य करीत असतात.परिणामी यांचा सेवण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे विविध आजार होण्यांचा धोका संभावत असतो.ग्रामस्थांच्या सुंदर आरोग्यासाठी येथिल शिक्षक आणी विद्यार्थ्यांच्या सहकार्यांने हा तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम हाती घेतल्यांने या शाळेचे सर्वत्र कौतुक होत असून आजवर कोणत्याही शाळेत उपक्रम हाती घेतल्या नसल्यामुळे या शाळेवर या संस्थे कडून कौतुकांची धाप पडली आहे.
हा उपक्रम हाती घेण्यांचे एकच कारण की आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे.त्याच बरोबर येणा-या पिढिला यांचे दुषपरिणा समजावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला गेला शिक्षिका सरस्वती कवाद,वैजनाथ जाधव उप शिक्षक स्वयं सेविका निकिता गडगे,साक्षी जांभुळकर, भाग्यश्री तांबोळी, आकांक्षा जाधव,श्रुतिका जांभुळकर,वेदीका गडगे,शाळा व्यवस्थापन समिती च्या शिल्पा जाधव,शुभदा दळवी, मानसी गडगे अदि या जनजागृती रॅलीत सहभागी होते.
चौकट :
प्रथम मी आमच्या सर्व विद्यार्थी,शिक्षक,पालक व ग्रामस्थांचे अभिनंद करतो व आभार मानतो.त्यांच्या सहकार्याने व अथक परिश्रमाने शाळेला हे यश मिळाले आहे.निश्चय,ध्येय ठेऊन व एकजुटीने काम केल्यास यश नक्की मिळते.
रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव मुख्याध्यापक : सुभाष राठोड,
0 Comments