गुरुकृपा प्रतिष्ठान माजगाव यांच्या वतीने उत्तम किल्ले बनविलेल्या मुलांचा गुणगौरव सोहळा

 गुरुकृपा प्रतिष्ठान माजगाव यांच्या वतीने उत्तम किल्ले बनविलेल्या मुलांचा गुणगौरव सोहळा 


                    प्रथम क्रमांक किल्ला - पन्हाळा 

पाताळगंगा न्युज : वृत्तसेव
माजगाव : ४: नोव्हेंबर,

                   दिवाळीच्या सुट्टीमध्ये बच्चे कंपनी एकत्र ऐवून उत्तम असे किल्ले तयार केले होते.त्यांनी बनविलेल्या किल्यांचे कौतुक व्हावे,शिवाय किल्ले संस्कृती जोपासली जावी या उद्दात दृष्टीकोणातून गड किल्ले स्पर्धेचे आयोजन गुरुकृपा प्रतिष्ठान माजगाव यांच्या माध्यमातून सलग ११ वर्ष करीत आहे.मुलांनी एकत्र ऐवून निर्माण केलेल्या किल्यांचे परिक्षण करुन त्यांना,पारितोषिक देवून सन्मानित करण्यांचे काम हे प्रतिष्ठान यांनी केले.
                द्वितीय क्रमांक किल्ला - राजगड 
          
     यावेळी प्रथम क्रमांक - किल्ले पन्हाळा
आराध्या, सौम्या, आर्यन, मयंक, माही, हर्षिता, प्रियांशू, प्रणय काठावले,पाटील टीम यांनी पटकावले तर द्वितीय क्रमांक - किल्ले राजगड हर्ष, विघ्नेश, समर्थ काठावले टीम यांनी पटकाविले,तसेच तृतीय क्रमांक - किल्ले पन्हाळा आर्यन, सार्थक, शिव,ओम, पियूष ढवाळकर, मोगारे,सातांबेकर टीम यांनी पटकाविले 
                तृतीय क्रमांक किल्ला - पन्हाळा 

           मुलांनी बनविलेल्या किल्यांचे परिक्षण करण्यांसाठी श्रीमद्रायगिरो प्रतिष्ठान किल्ले निरिक्षक म्हणून प्राश ठोंबरे ,महेश मोहिते, सचिन घोलप यांच्या माध्यमातून करण्यांत आले.गेली ११ वर्ष गुरुकृपा प्रतिष्ठान माजगाव यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतांना सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचे काम करीत आहे.वृक्ष लागवड आणी त्यांचे संवर्धन स्वच्छता,विद्यार्थ्यांस प्रोत्साहीत करणे अदि उपक्रम हाती घेत असल्यांचे मनोज पाटील,संदेश पाटील, प्रतिष्ठान च्या माध्यमातून सांगण्यात आले.

 
 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर