पन्हाळा किल्या बनवून चौक - जांभिवली च्या चिमुकल्यांनी किल्ले संवर्धनाचा दिला संदेश
जांभिवली : ५ नोव्हेंबर,
दिवाळीच्या सुट्टीत शाळेतील मुले पुन्हा एकदा मातीशी एकरुप होवून किल्ले बनवित असल्यांचे पहावयास मिळाले,शेतातील काळी माती,कंपास मधिल कलर्स आणी चुना च्या माध्यमातून किल्ले बनविण्यांच्या स्पर्धा ग्रामीण भागात पहावयांस मिळाले,चौक जांभिवली येथिल मयंक गावडे, जिया गावडे, स्वरा गावडे, माही गावडे या मुलांने पन्हाळा किल्ला उभारुन तो जतन करा,किल्ले वाचवा असा संदेश किल्यांच्या माध्यमातून चिमुकल्यांनी दिला.
आपल्या महाराष्ट्राला किल्लांचा मोठा इतिहास लाभला असून,आजही काही व्यक्ती किल्यांपर्यंत पोहचू शकले नाहीत,मात्र त्यांची उणीव शिवप्रेमी यांस भासू नये यासाठी ग्रामीण भागात किल्या घडविला जात आहे.या किल्यावर मावळे, सैन्य, तोफ, वाघ, हत्ती, हरीण असे विविध प्राणी,तसेच तोफ भुयारी मार्ग,नगर खाना,दारु गोळा,गुप्त बैठक,पाण्यांचे हौद,तलाव,विहीर,गुरांचा गोठा,मंदिर,मावळ्यांची राहण्यांचा निवारा तसेच प्रत्येक किल्यांची भोगोलीकता,इतिहास रंजक असून दिवाळी सुट्टीत बनविलेले किल्ले पाहताच क्षणी या शिवकालीन स्वराज्यांची आठवण निर्माण होत असते.
विषेश म्हणजे हा किल्ला बनविण्यांसाठी एक आठवडा लागला तसेच त्यांस बनविण्यांसाठी पालकांचे सुद्धा सहकार्य लाभले,भारतीय संस्कृती जतन,व्हावे या उद्दात विचारांतून हा उपक्रम हाती घेण्यांत आल्यांचे किल्ले प्रेमी चिमुकल्यांनी बोलतांना सांगितले.
0 Comments