माजगाव येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा

 माजगाव येथे हनुमान जन्मोत्सव  मोठ्या उत्सहात  साजरा 




 माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
माजगांव  : १३ एप्रिल, 

            'पवनपुत्र हनुमान की जय,बजरंग बळी की जय  या घोषात माजगाव परिसर भक्ती रसात तलीन झाले असल्यांचे पहावयांस मिळाले.हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे पहाटे पासुनच या ठीकाणी भाविक-भक्तानी हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये भक्ताची रेलचेल सुरु होती.
             भजन,कीर्तन, प्रवचन,विधिवत पूजाअर्चा आभिषेक,जन्मोत्सव असे कार्यक्रम संपन्न झाले. त्याचबरोबर धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यांत आले.यावेळी पहाटे पासुनच  ग्रामस्थ आणी तरुण वर्गानी उत्साह पहावयांस मिळाला.                  
               सायंकाळी महाप्रसाद एचडीएफसी बॅंक मोहपाडा शाखा प्रमुख व्यवस्थापक - महेश पाटील यांच्या माध्यमातून  देण्यांत आला.या कार्यक्रमाचे आयोजन जयेश पाटील,संदिप काठावले,रणधीर काठावले,किशोर पाटील,गजानन्न काठावले,शरद काठावले,दत्ता काठावले,कैलास पाटील,सचिन काठावले,दिनेश पाटील, निखिल काठावले,हरेश पाटील यांच्या माध्यमातून करण्यांत आले.त्याच बरोबर रात्री भजनाचा कार्यक्रमचे आयोजित करण्यात आले.यावेळी ग्रामस्थ मंडळ तरुण वर्ग उपस्थित होते. 





Post a Comment

0 Comments

शेतकरी वर्गांनी आंबा,काजू फळझाडे यांचा  ई पीक विमा उतरावे  - तालुका कृषी अधिकारी, खालापूर सुनिल निंबाळकर यांचे आवाहन