खालापूर तालुका भाजप प्रभारी मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या संकल्पनेतून क्रिकेट सामने
क्रिकेट महोत्सव चषकाचा मानकरी ठरला, विरेश्वर वरची खोपोली संघ
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ११ एप्रिल,
भारतीय जनता पक्ष खालापूर मंडळ व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खालापूर यांच्या वतीने खालापूर धाकटी पंढरी साजगाव मंदिर येथे क्रिकेट महोत्सवाचे करण्यात आले होते.खालापूर तालुक्यातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या वतीने खालापूर क्रिकेट महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा व कला महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यांत आला.यावेळी डे - नाईट क्रिकेट स्पर्धा मध्ये ४० संघानी सहभाग नोंदविला.
ह्या स्पर्धेत प्रथम क्रमांक विरेश्वर वरची खोपोली संघाला प्रथम पारितोषिक रोख रक्कम एक लाख व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.तर पारधी इलेव्हन साईबाबानगर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम पन्नास हजार हजार व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक अन्वी शिवश्री होराळे संघाला रोख रक्कम तीस हजार व आकर्षक चषक देण्यात आले.अनुक्रमे बापूजी चिलठणं संघ चतुर्थ व जय हनुमान संघ सारसन संघ पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम पंचवीस हजार व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द जय हनुमान सारसन संघाचा रोहित जाधव,उत्कृष्ट फलंदाज चिलठंन संघाचा भावेश गायकर तर उत्कृष्ट गोलंदाज साईबाबा नगर संघाचा सुशांत मोरे व स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वरची खोपोली संघाचा अक्षय सकपाळ या सर्वांस चषक देवून गौरविण्यांत आले.
हे क्रिकेट सामने पनवेल मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना टीशर्ट देण्यात आले.तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांचे कडून एक ते पाच क्रमांक आकर्षक चषक देण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, रविंद्र पाटील सरचिटणीस खालापूर तालुका, विकास रसाळ चिटणीस खालापूर तालुका, जगदीश आगिवले भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, हरीभाऊ जाधव वाहतूक सेल खालापूर तालुका अध्यक्ष, मुनीर धनसे , लव्हेश कर्णूक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील, युवा मोर्चा कर्जत विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, मयुर पाटील, प्रसाद देशमुख, विशाल लोते, अभिषेक कदम, महेश कडू, प्रणेश देशमुख, नयन पाटील, दत्ताराम पाटील, विकास मोरे, जयेंद्र पाटील, अनिकेत साळुंखे, स्वप्नील फराट, न्यानेश्वर् पारंगे , अरुण घोंगे, आकाश मुसळे, मनिष पाटील, तेजस घारे, अक्षय जाधव, सचिन डोखले, राहुल कडव,यांच्या प्रयत्नातून क्रिकेट महोत्सव स्पर्धा यशस्वी पार पडली.
0 Comments