खालापूर करंबेळी येथून चोवीस वर्षीय तरुण बेपत्ता.
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ९ डीसेंबर,
कामानिमित्ताने घराबाहेर पडलेला खालापूर तालुक्यातील करंबेळी गावचा स्वप्निल दिनेश शिंदे(वय 2४ ) हा दहा दिवस उलटून सुद्धा घरी परत न आल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
२९ नोव्हेंबर रोजी स्वप्निल हा त्याच्या राहत्या घरी करंबेळी गावातून सकाळी ११ वाजता कामानिमित्ताने बाहेर पडला होता.रात्री उशिरापर्यंत स्वप्निल घरी परत न आल्याने त्याच्या पालकाने मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडे स्वप्निल बाबत विचारणा केली. परंतु काहीच माहिती मिळाली नाही. सर्वत्र शोध घेऊन सुद्धा स्वप्निलचा काही तपास न लागल्याने त्याच्या पालकांनी खालापूर पोलीस ठाण्यात स्वप्निल हरवल्याची तक्रार दिली आहे.
उंचीने पाच फूट दोन इंच ,गोरा ,अंगाने सडपातळ ,अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला स्वप्निल कुठे आढळून आल्यास खालापूर पोलीस ठाणे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
0 Comments