डॉ.गौरी बाळासाहेब पाटील यांना पीएचडी, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने केला सत्कार
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २४ जानेवारी,
डाॅ.गौरी बाळासाहेब पाटील ( बारामती ) यांनी डेव्हलपमेंट आणि कॅरेक्टरायझेशन ऑफ इन्वासोमस फाॅर ट्रीटमेंट ऑफ फंगल इन्फेक्शन फार्मास्युटिकल सायन्सेस मध्ये पीएचडी पदवी मिळवल्याने त्यांचा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने सत्कार केला.
त्या मेखळी ता.बारामती जि.पुणे येथे त्या सध्या डेलोनिकस सोसायटीचे बारामती काॅलेज ऑफ फार्मसी बहाणपुर येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांनी पीएचडी चा अभ्यास भोपाळ मध्यप्रदेश येथील मानसरोवर ग्लोबल युनिव्हर्सिटी येथे केला आहे. अतिशय संघर्ष करुन जिद्द आणि चिकाटी चे जोरावर घर संसार सांभाळून पीएचडी परीक्षेत यश मिळवले आहे.
डॉ.पाटील म्हणाल्या की स्त्री ही मुळातच हुशार असते संयमी असते त्यांना योग्य मार्गदर्शन व घरातुन सपोर्ट मिळाला पाहिजे तसं मला माझ्या सासरच्या मंडळींनी खूप सपोर्ट केला आहे.म्हणून मी ही पीएचडी पदवी मिळवली आहे. महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुनिता विल्यम्स कल्पना चावला मदर तेरेसा यांचा आदर्श घेऊन स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच विकास होईल त्यासाठी शालेय जी वनापासून प्रयत्न केला पाहिजे मग आपणं ख-या अर्थाने यशस्वी होऊ.म्हणून त्यांचा सत्कार अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने करण्यात आला.
त्याप्रसंगी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रख्यात ग्रामीण कथाकार प्रा रविंद्र कोकरे एम.डी.दडस सर सातारा जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ सतिश देवकाते रमेश देवकाते अमोल चोपडे बाळासाहेब कोकरे सरपंच राकेश देवकाते डॉ.आकाश देवकाते, प्रशांत देवकाते, अक्षय देवकाते, राजाराम धायगुडे,शिवाजी देवकाते, बाळासाहेब पाटील, प्रा.अनिल करे, हनुमंत चोपडे, डॉ. सृष्टी कोकरे,नर्मदा कोकरे, रुपाली कोकरे,पोपटराव कोकरे, महेश चोपडे,अरविंद पांढरे, प्रतिक रुपनवर रामभाऊ देवकाते, इत्यादी उपस्थित होते.
0 Comments