मा.मंत्री महादेव जानकर यांनी दिली वावोशी कार्यालयाला सदिच्छा भेट
कार्यकर्त्यांच्या घेतल्या अडचणी जाणून
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १९ जानेवारी,
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा मा.मंत्री महादेव जानकर यांनी वावोशी येथील पक्ष कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाची मोठी संघटना असून कोकणचे प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे यांच्या नेतृत्वाखाली रासपला मोठी उभारी मिळत आहे.यावेळी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
गेल्या अनेक वर्षांपासून वावोशी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यालय असून या पक्ष कार्यालयातून भगवान ढेबे यांच्या माध्यमातून गोर गरिब जनतेच्या,आणि कामगारानांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे मा. मंत्री महादेव जानकर यांनी या कार्यालयाला भेट देत भगवान ढेबे यांना कोकणची नवीन कार्यकारणी तयार करून पक्षाची मोर्चे बांधणी करून जोमाने कामाला लागून येणाऱ्या निवडणुकीला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे, युवा नेते आबासो पुकळे, आनंद हिरवे, आनंद ढेबे, अविनाश नीरगुडकर, कीर्ती भोसले, मनीषा ठाकूर, मुकेश भगत, नवनाथ पाटील, राम केंडे, विजय उघडे, आदिसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments