चौक व तुपगाव ग्रुप ग्राम पंचायतीचा अजब कारभार,गटाराचे पाणी शेतात,नागरी वस्तीचे डंपिग ग्राउड,

 चौक व तुपगाव ग्रुप ग्राम पंचायतीचा अजब कारभार,गटाराचे पाणी शेतात,नागरी वस्तीचे डंपिग ग्राउड,खालापूर येथे २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण अथवा फासी 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
चौक : :२५ जानेवारी,

           चौक व तुपगाव या दोन्ही ग्रुप ग्राम पंचायत व बिल्डर यांच्या सहमताने गेली २ वर्ष गटाराचे पाणी नैसर्गिक नाल्यात सोडून, रोगराई निर्माण करीत आहे. त्याच बरोबर शेतीला गटाराचे स्वरुप देवून जमिन नापिक बनत चालली आहे.शेतीचे नुकसान व नागरी वस्तीचे डंपिग ग्राउड होत असून ग्रुप ग्रामपंचायत,सरपंच सह  सरकारी यंत्रणा यांनी या प्रश्नाबाबत दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ, शेतकरी हे सरनोबत नेताजी पालकर सभागृह तहसिल कार्यालय खालापूर येथे २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण, फांसी घेण्यात येत असल्यांचे येथिल ग्रामस्थांनी निवेदनात व्यक्त केले आहे. 
           चौक ग्रुप ग्राम पंचायतीने फेब्रुवारी २०२३ मध्ये नवीन गटार खोदण्यांत आले.मात्र गटाराचे पाणी नैसर्गिक नाल्यात सोडून त्याचे रुपांतर गटार गंगेत केले.त्याचबरोबर रवि प्रकाश नगर मधील भिंत तोडून अनेक ठिकाणी  खड्डे  खोदले असल्यामुळे पाणी एकाच ठिकाणी जमा होवून डास संख्या वाढत असून,घाण वासामुळे  रोगराई निर्माण होत आहे.यामुळे  ग्रामस्थ,शेतकरी, रहिवाशी यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

         सदर हेच गटाराचे पाणी या परिसरातील असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतात जावून शेती नापिक होत आहे.सदर  २२  महित्यात २४  वेळा विनंती अर्ज करण्यांत आले असून बीडीओ यांच्या मार्फत नोटीस देऊन सुद्धा चौक ग्रुप ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे.ह्या वर्षी जुलै महिन्यात पावसाचे आणि गटाराचे सांडपाणी, 
या पुरामुळे भात शेती मध्ये घुसले आणि संपूर्ण शेती नापीक झाली. १२  महिने शेतात गटाराचे पाणी  दोन फुट  राहत असून प्रत्येक वेळी बीडोओ ऑफिस, तहसिल कार्यालय  आणि चौक व तूपगाव ग्रुप ग्रामपंचायत मध्ये अर्ज करून सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे त्यामूळे उद्या २६  जानेवारी रोजी तहसील कार्यालय खालापूर येथे बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग निवडला असल्यांचे 
यशवंत सकपाल यांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले   

        



 

Post a Comment

0 Comments

भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष पदी सनी यादव यांची निवड